Posts

Showing posts from September, 2024

माझ्या संग्रहातील नाणी भाग 2

नमस्कार मागील भागात आपण माझ्या नाणे संग्रहातील सुरुवात ब्रिटिश कालखंडातील नाण्यापासून केली होती आज आपण जॉर्ज v, व सहाव्या जॉर्ज ची माझ्या संग्रहातील  १ क्वार्टर आना ची नाणी त्यांची माहिती बगणार आहोत तसेच जॉर्ज ५च एक वादग्रस्त ठरलेलं नाणं ही आपण आज पाहणार आहोत         तर सुरुवात करूया जॉर्ज पंचम (एडवर्ड सात )च्या 1क्वार्टर आणा या नाण्यापासून  तपशील  जारीकर्ता :- ब्रिटिश भारत  किंग जॉर्ज पंचम(एडवर्ड सातवा१९१०-१९३६) प्रकार:- सामान्य चलन  चलन :-रुपया (१७७०-१९४५) किंमत :-२५ पैसे(1/4) वर्षे :-१९१२-१९३६ रचना :-कांस्य धातू (bronze) वजन :-४. ८५ग्राम  व्यास:-२५.८४मिमी  जाडी :-१. ३५मिमी  आकार :- वर्तुळाकार  दर्शनी बाजू :- या नाण्याच्या दर्शनी बाजूवर बाहेरच्या वर्तुळात द्राक्षाच्या वेली आहेत तर आतील वर्तुळात नाण्याचे मूल्य इंग्रजी भाषेत लिहिले आहे त्याखाली वर्ष व त्याखाली टांकसाळ चिन्ह कोरलेलं आहे  मागील बाजू :- या नाण्याच्या मागील बाजूस एडवर्ड सातवा याची डावीकडे तोंड केलेली मुकुट घातलेली प्रतिमा व त्याबरोबर गोलाकार अक्षरांत...