माझ्या संग्रहातील नाणी भाग 2

नमस्कार मागील भागात आपण माझ्या नाणे संग्रहातील सुरुवात ब्रिटिश कालखंडातील नाण्यापासून केली होती आज आपण जॉर्ज v, व सहाव्या जॉर्ज ची माझ्या संग्रहातील  १ क्वार्टर आना ची नाणी त्यांची माहिती बगणार आहोत तसेच जॉर्ज ५च एक वादग्रस्त ठरलेलं नाणं ही आपण आज पाहणार आहोत 
       तर सुरुवात करूया जॉर्ज पंचम (एडवर्ड सात )च्या 1क्वार्टर आणा या नाण्यापासून 

तपशील 
जारीकर्ता :- ब्रिटिश भारत
 किंग जॉर्ज पंचम(एडवर्ड सातवा१९१०-१९३६)
प्रकार:- सामान्य चलन 
चलन :-रुपया (१७७०-१९४५)
किंमत :-२५ पैसे(1/4)
वर्षे :-१९१२-१९३६
रचना :-कांस्य धातू (bronze)
वजन :-४. ८५ग्राम 
व्यास:-२५.८४मिमी 
जाडी :-१. ३५मिमी 
आकार :- वर्तुळाकार 
दर्शनी बाजू :- या नाण्याच्या दर्शनी बाजूवर बाहेरच्या वर्तुळात द्राक्षाच्या वेली आहेत तर आतील वर्तुळात नाण्याचे मूल्य इंग्रजी भाषेत लिहिले आहे त्याखाली वर्ष व त्याखाली टांकसाळ चिन्ह कोरलेलं आहे 
मागील बाजू :- या नाण्याच्या मागील बाजूस एडवर्ड सातवा याची डावीकडे तोंड केलेली मुकुट घातलेली प्रतिमा व त्याबरोबर गोलाकार अक्षरांत इंग्रजी भाषेत KING GEORGE V EMPEROR असं कोरलेलं आहे  आता आपण ते वादग्रस्त नाणं पाहूया 
जॉर्ज पंचम च वादग्रस्त ठरलेलं एक रुपयाच नाणं हे नाणं त्यावरील एका चुकीमुळे वादग्रस्त ठरलं त्याच्या गळ्यावरील हत्तीची सोंड ही लहान झाल्याने तो हत्ती हा डुक्कर वाटू लागला आधीच १८५७ च्या झालेल्या क्रांती मुळे मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला होता त्यात नाण्यावरील पिग म्हणजेच डुकराच्या झालेल्या चुकीमुळे अजूनच असंतोष निर्माण झाला त्यात हत्तीची केली गेलेली विटंबना ही हिंदू धर्मियांना ही खटकली ही चूक लक्षात येताच यातील बहुतेक नाणी ही वितळवून नवीन पडली गेली त्यामुळे हे नाण नाणेसंग्रहकात पिग रुपी (pig rupee) म्हणून प्रसिद्ध आहे 
एडवर्ड VII च्या पुतळ्याची नाणी 1⁄12 आना, 1⁄2 पीस, 1⁄4 आना, 1 आना, 2 आना, 1⁄4 रुपया, 1⁄2 रुपया आणि 1 रुपयाच्या मूल्यांमध्ये जारी करण्यात आली.
तर यातील दुसरे जॉर्ज 6 च्या नाण्याचा तपशील ही सारखाच आहे फक्त त्यात थोडाफार बदल आहे 

तपशील 
जारीकर्ता :- जॉर्ज सहावा (१९३६-१९५२)
प्रकार:- सामान्य चलन 
चलन :-रुपया (१७७०-१९४५)
किंमत :-२५ पैसे(1/4)
वर्षे :-१९३८-१९४०
रचना :-कांस्य धातू (bronze)
वजन :-४. ८५ग्राम 
व्यास:-२५.८४मिमी 
जाडी :-१. ३५मिमी 
आकार :- वर्तुळाकार 
दर्शनी बाजू :- या नाण्याच्या दर्शनी बाजूवर बाहेरच्या वर्तुळात द्राक्षाच्या वेली आहेत तर आतील वर्तुळात नाण्याचे मूल्य इंग्रजी भाषेत लिहिले आहे त्याखाली वर्ष व त्याखाली टांकसाळ चिन्ह कोरलेलं आहे 
 मागील बाजू :- ह्यां नाण्याची मागील बाजू ही पंचम जॉर्ज च्या नाण्यासारखीच आहे ह्यावरही जॉर्ज सहावा याची याची डावीकडे तोंड केलेली मुकुट घातलेली प्रतिमा व त्याबरोबर गोलाकार अक्षरांत इंग्रजी भाषेत KING GEORGE VI EMPEROR असं कोरलेलं आहे 
 ही झाली माझ्या संग्रहातील ब्रिटिशकालीन नाण्यांच्या प्रकारांची प्रतिनिधिक माहिती तस माझ्याकडे जॉर्ज 5 ची विविध वर्षांतील 5व सहाव्या जॉर्ज ची सात अशी एकूण 12 नाणी आहेत 
पुढील भागापासून आपण स्वातंत्र्योत्तर  भारताची माझ्या संग्रहातील नाणी पाहणार आहोत 

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी