Posts

शिवरायांनी उल्लेखलेली चौऱ्याऐंशी बंदरे आणी अठरा टोपीकर

Image
नमस्कार माझं नाव हितेश आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यसीमा विस्तारत असताना गुजरातमधील सुरत ते कर्नाटकातील बसरूर या दरम्यान एकूण चौर्याऐंशी बंदर असल्याचे माहिती होते तसेच त्याकाळात १८ परकीय व्यापारी स्वराज्याच्या सीमेभोवती घोंगावत होते तर त्या चौर्याऐंशी बंदर व अठरा टोपीकर यांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. मालवण जिंकून स्वराज्यात आल्यावर मालवण किनारी फिरत असता समुद्रात महाराजांना एक बेट दिसले राजांनी त्याचे नाव विचारले तेव्हा त्यास कुरटे म्हणतात असे असे समजले. शिवरायांनी कुरटे बेट पाहून म्हंटले चौऱ्याऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही, इथं बंदरी नूतन जंजिरा वसवावा. चित्रगुप्ताच्या बखरीत सिंधुदुर्गाबद्दल आणि त्याच्या महतीबद्दल अतिशय सुंदर वर्णन केलं आहे – चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा. जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन, तैसा महाराजांचे राज्याचा भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल कि महाराजांना ...

मी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे बनवलेली व्यंगचित्रं

Image
व्यंगचित्रकार - हितेश चव्हाण.   सदर व्यंगचित्रे गुगलच्या जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्ता माध्यम AI द्वारे बनवली आहेत तरी सदर व्यंगचित्रांबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा. संपर्क-  GMail ४-१-२०२५©copyrighted content  कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क  व्यंगचित्रकार म्हणून हितेश चव्हाण यांचेकडे आहेत तरी व्यंगचित्रकाराच्या परवानगीशिवाय सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे. IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM

गधेगळ इतिहासातील एक काळी बाजू

Image
नमस्कार मंडळी माझ नाव हितेश आजच्या या लेखात आपण एका अश्या शिलालेखाच्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला इतिहासाची काळी बाजू म्हणून ओळखले जात. हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे अश्याच प्रकारची अभिशाप शिळा माझ्या गावात आहे जिला स्थानिक लोक गडदु असं म्हणतात. हा लेख लिहिण्याची प्रेरणा मला आमच्या गावातील इतिहास अभ्यासक श्री चैतन्यजी सरदेशपांडे ह्यांच्या फेसबुक पोस्ट वरून मिळाली तसेच हि शिळा मी माझ्या शैक्षणिक जीवनात तसेच आजही अनेकदा पाहत असल्याने त्या शिळेबद्दल कुतूहल होतेच पण जेव्हा त्याबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा ती गधेगळ असल्याचे लक्षात आले. तर आजच्या या लेखात आपण गधेगळ या प्रकारबद्दल खालील मुद्द्यांवरून जाणून घेणार आहोत.सदर माहिती अंतरजालावरील विविध स्रोतांमधून संकलित केलेली आहे. *गधेगळ कोरण्यामागील उद्देश, तिचे प्रकार व पूर्वेतिहास. *गधेगळीचे स्वरूप  *माझ्या गावातील गडदु/गधेगळी बद्दल माहिती. * गधेगळ कोरण्यामागील उद्देश, तिचे प्रकार व पूर्वेतिहास-  गधेगळं कोरण्याची सुरुवात शिलाहार काळापासून झाली पुढे या प्रकारच्या शिळा यादव, चालुक्य, कादंब, विजयनगरचे संगम घराणे(हरिहर दुसरा),...

माझ्या संग्रहातील दुर्मिळ नाणे

Image
तर आज मी तुम्हाला माझ्या संग्रहातील हे दुर्मिळ नाण कोणतं आहे ते सांगणार आहे तर ते आहे हाय क्राऊन व्हरायटी १पीस ब्रिटिश भारतीय नाणे  ह्या नाण्याबद्दल मी खालील मुद्द्यांद्वारे माहिती देणार आहे.  * तपशील  * वैशिष्ट्य  *विविधता  *दुर्मिळतेमागील कारण. *तपशील: जारीकर्ता भारत - ब्रिटिश (ब्रिटिश भारत)  सम्राट जॉर्ज सहावा (१९३६-१९४७) प्रकार -मानक चलन नाणी वर्षे १९४३-१९४७. मूल्य:- १.५६ पैसे  (१⁄६४)भारतीय चलन पद्धती. १पीस (१/४ OF 1ANNA) ब्रिटिश भारतीय आणा पद्धती . चलन-ब्रिटिश भारतीय आणा पद्धती. रचना -कांस्य वजन -२ ग्रॅम व्यास -२१.३२ मिमी जाडी -१.० मिमी. आकार -गोल छिद्रासह गोलाकार. कडा -सपाट. टांकसाळ- मुंबई,कोलकाता,लाहोर,प्रिटोरिया. पुढील बाजू- रॉयल इंपिरियल क्राऊन,देवनागरी व इंग्रजी व उर्दूत नाण्याचे मूल्य इंग्रजी भाषेत इंडिया हि आद्याक्षरे,जारीकर्ता वर्ष,टांकसाळ चिन्ह. मागील बाजू- मागील बाजूवर वर्तुळकार द्राक्षाच्या वेली. * वैशिष्ट्य: * हि नाणी सहावा जॉर्ज याचा कालखंडात १९४३-४७अश्या चार वर्षात पाडली गेली. तत्पूर्वी सर्व ब्रिटिश भारतीय...

पत्रास कारण कि

प्रति, महाराष्ट्रातील तमाम नागरिक  दिनांक- २९/९/२०२५ विषय- शेतकरी राजा कि रंक!  महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना माझा नमस्कार. मी कोण?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; मी या राज्यातील एक सामान्य शेतकरी.पत्रास कारण कि, बळीराजा म्हणून माझी ओळख सर्वसाधारणपणे आहे.पण मी राजा आहे कि रंक? असा प्रश्न मला पडलाय. त्याचीच चर्चा आज मला तुमच्यासोबत करायचीय. कारण बरेच जण मी आत्महत्या केली कि त्यामागील कारण समजून न घेता विविध प्रकारे व्यक्त होतात. काही जणांना वाटत मी कर्ज काढून मज्जा करतो मग परतफेड करायची वेळ आली कि नुकसान झाल्याचे कारण सांगून आत्महत्या करतो पण खरं कारण मलाच माहिती आहे.  कालपासून तुम्ही बातम्यात एक बातमी वाचली असेल कि मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलीय कारण तिथे सतत मुसळधार पाऊस पडतोय.  विलास बडे यांच्या सारखे सच्चे पत्रकार आणी काही स्थानिक प्रतिनिधी  प्रत्यक्ष पुरात जाऊन पत्रकारिता आणी जनसेवा करतायत. या पुरात आमच्या मका टोमॅटो इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालंय. आमच्यासाठी पीक म्हणजे आमची लेकरच आहेत आम्ही धरणीला आमची आई मानतो. पाच वर्ष मेहनत करून तळहात...

महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील ठिकाणांच्या नावामागील व्युत्पत्ती भाग१.

नमस्कार आज मी तुम्हाला मुंबईतील २१ प्रसिद्ध ठिकाणांंच्या नावामागील इतिहास जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण मुंबईचा इतिहास जाणून घेऊया,मुंबई हि इंग्रजांना सोळाव्या शतकात पोर्तुगीजाकडून आंदण म्हणून मिळाली त्यानंतर त्यांनी वर्षाला दहा पाउंड इतक्या भाड्यावर ती इस्ट इंडिया कंपनीला दिली तेव्हा तिचे स्वरूप आजच्या मुंबई सारखे नव्हते तेव्हा ती सात बेट होती ती पुढीलप्रमाणे मुंबई,माहीम,वरळी,परळ, कुलाबा,छोटा कुलाबा,माझगाव.  तसेच आजूबाजूला छोटी बेट सुद्धा होती पुढे ‘ हॉर्नी बेलार्ड ’ या प्रकलपांतर्गत भराव टाकून आजच्या मुंबईचे स्वरूप तिला प्राप्त झाले. चला तर मग लेखाला सुरुवात करूया. १.मुंबई- मुंबईला मुंबई हे नाव मुंबा देवी वरून पडले मुंबा+आई =मुंबई.पुढे इंग्रजांना भारतीय भाषांचे वावडे असल्याने त्यांनी त्याचे नामकरण बॉम्बे केले. २. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -  ह्या भागाचे पूर्वीचे नाव बोरिबंदर होते येथे जवळ एक बंदर होते जेथे सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट चा परिसर आहे.तसेच बोरीची मोठ्या प्रमाणात झाडें होती ह्यामुळे ह्याला बोरिबंदर नाव पडले पुढे भारतातील पहिली रेल्वे ठाणे ते बोरिबंदर अशी धावल्य...

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

Image
नमस्कार आज आपण अंतरराष्ट्रीय स्तरावर जे ग्रेगोरियन कालगणना(कॅलेंडर) वापरतो मात्र त्याचा इतिहास आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती नसतो तर आज आपण त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत.           ज्यूलीएट्स सीझर. ज्यूलीयन कालगणना हि ज्यूलीएट्स सीझर याने पंधराव्या शतकात सुरु केली हि सौर कालगणना होती.अर्थात पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्यास लागणारा काळ हा एक वर्ष धरून त्याचे विभाजन बारा महिन्यात केले गेले. ३६५दिवस६तास म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष हे ज्यूलीयन कालगणनेने मान्य केले.   मग हि सहा तासांची पोकळी भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी लीप वर्ष मानून एक दिवस म्हणजे २३फेब्रुवारी दोनदा धरला जात होता.परंतु काही कालावधीनंतर लोकांच्या कालगणनेत गडबड असल्याचे लक्षात आले कारण इस्टर हा ज्यूलीयन कालगणनेनुसार २१ मार्चला यायचा पण तो कालगणनेतील एका नजरचुकीमुळे शतकानुशतक मागे जायला लागला.मग सीझर च्या असं लक्षात आल कि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास ३६५दिवस ६तास इतका वेळ नाही लागत.तर तो वेळ हा  ३६५ दिवस ५तास ४८ मिनिट    इतका आहे. ह्या बारा मिनिटांच्या पोकळीमुळे दर हजार ...