दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी
पहिला भाग ☝️पहिल्या भागाची लिंक नमस्कार माझं नाव हितेश मागील भागात आपण रायगडची प्रभावळ व नैसर्गिक संरचना समजून घेतली.आता रायरी ज्या जवळीच्या खोऱ्यात होता त्या जावळीवर राज्य करणाऱ्या चंद्रराव मोरेंचा इतिहास,छत्रपती शिवराय व जावळी,जावळीच्या मोऱ्यांचे प्रभावळीतील इतर सरदारांशी असलेले सहसंबंध,व रायरीचा दुर्गराज रायगड होण्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. चंद्रराव मोरेंचा इतिहास :- चंद्रगुप्त मौर्य याच्या काळात मौर्य सम्राज्याचा विस्तार दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणात त्याच्या मृत्युंनंतर बिंबीसार हा राजगादी वर आला मात्र बिंबीसाराच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये गादीसाठी एकच नरसंहार झाला त्याच्या मुलांपैकी एक चंद्रराव मौर्य हा जावळीच्या खोऱ्यात सम्राट अशोकापासून वाचण्याकरिता लपून बसला. त्याकाळात जावळीचे खोरे हे कृष्णा व वारणा नद्यांंकाठी पन्हाळा,विशाळगड ते रायरी महाबळेश्वर असे विस्तीर्ण व घनदाट होते या चंद्ररावाने येथे चंद्रराव मोर्य म्हणून आपले स्वातंत्र्य राज्य साथपन केले चंद्रराव मोर्य हा मोरेंचा घराण्याचा संस्थापक होय.‘ मौर्य’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन मोरे हे आडनाव रूढ ...