किल्ले जंजिरे मेहरुब आणी शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज
रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील मुरुड नजीकच्या दंडाराजपुरी गावातील एका बेटावर असलेला अजिंक्य असा जंजिरा किल्ला इसवी सन १६१७ मध्ये पेरिमखान नावाच्या हबशी सरदराने राम पाटील या स्थानिक कोळी बांधवाच्या कडून दग्याने जिंकून निजामकडून परवानगी घेऊन बांधला. त्यापूर्वी तिथे मेढेकोट होता.मेढेकोट म्हणजे लाकडी दमदमे(बुरुज )व तटबंदी त्यावर कोळी लोकांचे राज्य होते.त्यातील कोल्यांच्या शेवटचा प्रमुख राम पाटलास तेलाच्या व्यापाराच्या निमित्ताने किल्ल्यात आसरा घेऊन तेलाच्या पिंपात सैन्य लपवून कैद केले व त्याचा नंतर शिरच्छेद केला पेरिमखान हेच सिद्धीचे मूळ पुरुष. हे सिद्धी मूळचे आबेसेनिया प्रांतातील अबेसेनिया चा अपभ्रउंश हबशी पुढे जाऊन भारतीय परकीय राज्यकर्ते मुघल, निजामशाहा, आदिलशहा कुतूबशहा इ. पातशह्यांचे समुद्रावर फारसा वचक नसल्याने हा सिद्दी सार्वभौम बनला परंतु शिवाजी महाराजांनी आरामारी व जलदूर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे सिद्धिवर वाचक बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या मोहिमेचा आपण आज विस्ताराने आढावा घेणार आहोत. तसेच संभाजी राजांनी बांधलेला पूल, कोंडाजी फर...