गणपतीचा गाऱ्हाणा
“बा देवा गणपती गजानना शिव गौरीच्या तनया रिद्धी सिद्धीच्या दाता! " व्हय महाराजा! सालाबाद प्रमाणे यंदाही आम्हा सर्वांनी तुजी स्थापना केलेली असा ती मान्य करून घे महाराजा! व्हय महाराजा! त्यात काय कमी रव्हली असात तर ती पोटात घे आणी सर्वांका शेतीत आणी कामाधंद्यात यश दे रे महाराजा! व्हय महाराजा! हे अकरा दिवस तुज्या दर्शनाक जे जे भक्तजन येतलंत त्यांका सुख समृद्धी समाधान मिळानदे चाकरमान्यांका नोकरीं व्यवसायात यश दि पोराटोरांका शिक्षणात सुयश दे रे महाराजा! व्हय महाराजा! हय ता आमच्या साखरप्या चो रसतो कित्येक वर्षा झाली खड्डेमय असा त्याचा बरोबर मुंबई गोवा हायवे पण काही ठिकाणी भंगलो असत सरकारका तो दुरुस्ती करण्याची सद्बुद्धी दे रस्तो ठीक नाय केल्यानी तर या सरकारवर पटकी येवंदे दे रे महाराजा! व्हय महाराजा! दरवर्षी कोकण रेल्वेने चाकरमानी आरक्षण करान तुज्या सनासाठी येत असतात पण त्यांका तिकिट गावात नाय ह्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार व्हता त्या काळोबाजार करणार्यांवर पटकी येवंन्दे रे महाराजा! व्हय महाराजा! आजकाल मराठी माणसाने मराठी बोलना कमी केलेला आसात यामुळे परप्रांरतीय मह...