माझ्या संग्रहातील दुर्मिळ नाणे
तर आज मी तुम्हाला माझ्या संग्रहातील हे दुर्मिळ नाण कोणतं आहे ते सांगणार आहे तर ते आहे हाय क्राऊन व्हरायटी १पीस ब्रिटिश भारतीय नाणे ह्या नाण्याबद्दल मी खालील मुद्द्यांद्वारे माहिती देणार आहे. * तपशील * वैशिष्ट्य *विविधता *दुर्मिळतेमागील कारण. *तपशील: जारीकर्ता भारत - ब्रिटिश (ब्रिटिश भारत) सम्राट जॉर्ज सहावा (१९३६-१९४७) प्रकार -मानक चलन नाणी वर्षे १९४३-१९४७. मूल्य:- १.५६ पैसे (१⁄६४)भारतीय चलन पद्धती. १पीस (१/४ OF 1ANNA) ब्रिटिश भारतीय आणा पद्धती . चलन-ब्रिटिश भारतीय आणा पद्धती. रचना -कांस्य वजन -२ ग्रॅम व्यास -२१.३२ मिमी जाडी -१.० मिमी. आकार -गोल छिद्रासह गोलाकार. कडा -सपाट. टांकसाळ- मुंबई,कोलकाता,लाहोर,प्रिटोरिया. पुढील बाजू- रॉयल इंपिरियल क्राऊन,देवनागरी व इंग्रजी व उर्दूत नाण्याचे मूल्य इंग्रजी भाषेत इंडिया हि आद्याक्षरे,जारीकर्ता वर्ष,टांकसाळ चिन्ह. मागील बाजू- मागील बाजूवर वर्तुळकार द्राक्षाच्या वेली. * वैशिष्ट्य: * हि नाणी सहावा जॉर्ज याचा कालखंडात १९४३-४७अश्या चार वर्षात पाडली गेली. तत्पूर्वी सर्व ब्रिटिश भारतीय...