माझ्या संग्रहातील दुर्मिळ नाणे
तर आज मी तुम्हाला माझ्या संग्रहातील हे दुर्मिळ नाण कोणतं आहे ते सांगणार आहे तर ते आहे हाय क्राऊन व्हरायटी १पीस ब्रिटिश भारतीय नाणे
ह्या नाण्याबद्दल मी खालील मुद्द्यांद्वारे माहिती देणार आहे.
* तपशील
* वैशिष्ट्य
*विविधता
*दुर्मिळतेमागील कारण.
*तपशील:
जारीकर्ता भारत - ब्रिटिश (ब्रिटिश भारत)
सम्राट जॉर्ज सहावा (१९३६-१९४७)
प्रकार -मानक चलन नाणी
वर्षे १९४३-१९४७.
मूल्य:- १.५६ पैसे (१⁄६४)भारतीय चलन पद्धती.
१पीस (१/४ OF 1ANNA) ब्रिटिश भारतीय आणा पद्धती.
चलन-ब्रिटिश भारतीय आणा पद्धती.
रचना -कांस्य
वजन -२ ग्रॅम
व्यास -२१.३२ मिमी
जाडी -१.० मिमी.
आकार -गोल छिद्रासह गोलाकार.
कडा -सपाट.
टांकसाळ- मुंबई,कोलकाता,लाहोर,प्रिटोरिया.
पुढील बाजू- रॉयल इंपिरियल क्राऊन,देवनागरी व इंग्रजी व उर्दूत नाण्याचे मूल्य इंग्रजी भाषेत इंडिया हि आद्याक्षरे,जारीकर्ता वर्ष,टांकसाळ चिन्ह.
मागील बाजू- मागील बाजूवर वर्तुळकार द्राक्षाच्या वेली.
* वैशिष्ट्य:
* हि नाणी सहावा जॉर्ज याचा कालखंडात १९४३-४७अश्या चार वर्षात पाडली गेली. तत्पूर्वी सर्व ब्रिटिश भारतीय नाण्यांवर तत्कालीन सम्राटाच्या प्रतिमा कोरलेल्या असत परंतु हे नाणे द्वितीय विश्वयुद्धाच्या कालखंडातील असल्याने या नाण्याच्या मध्ये भोक असलेले दिसून येते नाण्याचा आकारमान छोटा असल्याने त्यावर रॉयल इंपिरियल क्राऊन आहे.हे या नाण्याचे एक वैशिष्ट्य आहे.
*ह्या नाण्याचे आणी तत्कालीन क्वार्टर आणा ह्या नाण्याचे तेव्हाचे चलनी मूल्य एकच होते. परंतु १आणा= ४पीस म्हणून १पीस म्हणजे १क्वार्टर आणा म्हणून त्या नाण्यावर एक क्वार्टर आणा असे कोरलेले होते मात्र जॉर्ज सहावा हा एकमेव सम्राट आहे त्याच्या काळात या नाण्यावर 1पीस असं कोरले आहे.
* या नाण्याच्या भोकाच्या भागातील तांब्याच्या भागाचा उपयोग द्वितीय विश्व्युद्धात बंदुकीची काडतूस बनवण्यासाठी केला जायचा. हेसुद्धा या नाण्याचे वैशिष्ट्य आहे.
*हि नाणी हि भारतावरील ब्रिटिश सम्राज्याच्या अस्ताचे प्रतीक आहे जॉर्ज सहावा हा भारतावरील शेवटचा ब्रिटिश सम्राट होता.
*ह्या नाण्यांवरब्रिटिश राजवटीच्या इतिहासात प्रथमच 2भारतीय भाषा कोरलेल्या होत्या हेसुद्धा या नाण्यांचे वैशिष्ट्य आहे.
*विविधता-
या नाण्यांवर राजाची प्रतिमा नसल्याने यात रॉयल इंपिरियल क्राऊनमध्ये हाय क्राऊन,फ्लॅट क्राऊन,राउंड क्राऊन अशी विविधता दिसून येते ते वरील प्रकाशचित्र झूम इन करून पाहू शकता.
*या नाण्याच्या दुर्मिळतेमागील कारण:
हे नाणे लाहोर येथील टांकसाळीत पाडलेलं आहे. या टांकसाळीत या चार वर्षात एकंदरीत इतर टांकसाळीच्या तुलनेत कमी नाणी पाडली गेली त्यातही १९४४ च्या सालातील हाय क्राऊन असलेली लाहोर टांकसाळीची नाणी फारच कमी आहेत त्यामुळे हे नाणे तुलनेने दुर्मिळ असून संग्रहकांच्या पसंतीचे आहे.
So today I am going to tell you about this rare coin in my collection, it is High Crown Variety 1 Piece British Indian Coin
I will give information about this coin through the following points.
* Details
* Features
* Variety
* Reason behind rarity.
* Details:
Issuer India - British (British India)
Emperor George VI (1936-1947)
Type - Standard Currency Coins
Years 1943-1947.
Value:- 1.56 paise (1⁄64) Indian Currency System.
1 Piece (1/4 OF 1ANNA) British Indian Anna System.
Currency-British Indian Anna System.
Composition - Bronze
Weight - 2 grams
Diameter - 21.32 mm
Thickness - 1.0 mm.
Shape - Round with round hole.
Edge - Plain.
Mints- Mumbai, Kolkata, Lahore, Pretoria.
Obverse- Royal Imperial Crown,value of the coin in Devanagari and English and Urdu, India initials in English, year of issue, mint mark.
Reverse- Circular grape vines on the reverse.
* Features:
* This coin was minted during the reign of George VI in four years, 1943-47. Before that, all British Indian coins had the portrait of the then emperor engraved on them, but since this coin is from the period of World War II, it is seen that there is a hole in the middle of this coin. Since the size of the coin is small, thats why there is a Royal Imperial Crown on it. This is a feature of this coin.
* The currency value of this coin and the Quarter Anna coin was the same at that time. But since 1 anna = 4 pieces, 1 piece means 1 quarter, so it was engraved on that coin as 1 quarter, but George VI is the only emperor during his time, this coin is engraved as 1 piece.
* The copper part of the hole of this coin was used to make gun cartridges in World War II. This is also a feature of this coin.
* This coin is a symbol of the fall of the British Empire in India. George VI was the last British emperor in India.
* This coin is also a feature of these coins that for the first time in the history of the British rule, 2 Indian languages were engraved on these coins.
* Diversity-
Since there is no image of the king on these coins, there are variations in the Royal Imperial Crown such as High Crown, Flat Crown, Round Crown, which you can see by zooming in on the photo above.
*Reason behind the rarity of this coin:
This coin was minted at the Lahore Mint. This mint has minted fewer coins during four mintage years than any other mint. In particular, there are very few coins from the Lahore Mint with the High Crown from 1944, so this coin is relatively rare and is a favorite of collectors.
लेखक- हितेश चव्हाण.
Author hitesh chavan.
सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा.
संपर्क- chavanhitesh63@gmail.com
०३-१२-२०२५©copyrighted content
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM
Comments
Post a Comment