महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील ठिकाणांच्या नावामागील व्युत्पत्ती भाग१.
नमस्कार आज मी तुम्हाला मुंबईतील २१ प्रसिद्ध ठिकाणांंच्या नावामागील इतिहास जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण मुंबईचा इतिहास जाणून घेऊया,मुंबई हि इंग्रजांना सोळाव्या शतकात पोर्तुगीजाकडून आंदण म्हणून मिळाली त्यानंतर त्यांनी वर्षाला दहा पाउंड इतक्या भाड्यावर ती इस्ट इंडिया कंपनीला दिली तेव्हा तिचे स्वरूप आजच्या मुंबई सारखे नव्हते तेव्हा ती सात बेट होती ती पुढीलप्रमाणे मुंबई,माहीम,वरळी,परळ, कुलाबा,छोटा कुलाबा,माझगाव. तसेच आजूबाजूला छोटी बेट सुद्धा होती पुढे ‘ हॉर्नी बेलार्ड ’ या प्रकलपांतर्गत भराव टाकून आजच्या मुंबईचे स्वरूप तिला प्राप्त झाले. चला तर मग लेखाला सुरुवात करूया. १.मुंबई- मुंबईला मुंबई हे नाव मुंबा देवी वरून पडले मुंबा+आई =मुंबई.पुढे इंग्रजांना भारतीय भाषांचे वावडे असल्याने त्यांनी त्याचे नामकरण बॉम्बे केले. २. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ह्या भागाचे पूर्वीचे नाव बोरिबंदर होते येथे जवळ एक बंदर होते जेथे सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट चा परिसर आहे.तसेच बोरीची मोठ्या प्रमाणात झाडें होती ह्यामुळे ह्याला बोरिबंदर नाव पडले पुढे भारतातील पहिली रेल्वे ठाणे ते बोरिबंदर अशी धावल्य...