महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील ठिकाणांच्या नावामागील व्युत्पत्ती भाग१.
नमस्कार आज मी तुम्हाला मुंबईतील २१ प्रसिद्ध ठिकाणांंच्या नावामागील इतिहास जाणून घेणार आहोत.
तत्पूर्वी आपण मुंबईचा इतिहास जाणून घेऊया,मुंबई हि इंग्रजांना सोळाव्या शतकात पोर्तुगीजाकडून आंदण म्हणून मिळाली त्यानंतर त्यांनी वर्षाला दहा पाउंड इतक्या भाड्यावर ती इस्ट इंडिया कंपनीला दिली तेव्हा तिचे स्वरूप आजच्या मुंबई सारखे नव्हते तेव्हा ती सात बेट होती ती पुढीलप्रमाणे मुंबई,माहीम,वरळी,परळ, कुलाबा,छोटा कुलाबा,माझगाव.
तसेच आजूबाजूला छोटी बेट सुद्धा होती पुढे ‘हॉर्नी बेलार्ड ’या प्रकलपांतर्गत भराव टाकून
आजच्या मुंबईचे स्वरूप तिला प्राप्त झाले.
चला तर मग लेखाला सुरुवात करूया.
१.मुंबई-
मुंबईला मुंबई हे नाव मुंबा देवी वरून पडले मुंबा+आई =मुंबई.पुढे इंग्रजांना भारतीय भाषांचे वावडे असल्याने त्यांनी त्याचे नामकरण बॉम्बे केले.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -
ह्या भागाचे पूर्वीचे नाव बोरिबंदर होते येथे जवळ एक बंदर होते जेथे सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट चा परिसर आहे.तसेच बोरीची मोठ्या प्रमाणात झाडें होती ह्यामुळे ह्याला बोरिबंदर नाव पडले पुढे भारतातील पहिली रेल्वे ठाणे ते बोरिबंदर अशी धावल्याने इंग्रजांनी येथे भव्य रेल्वेस्थानक उभारून त्याला विक्टोरिया टर्मिनस असे नामकरण केले जे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते.
३.सायन -
सायनचे मूळ नाव शीव असे होते.शीव ह्याचा अर्थ सीमा.हे दादर च्या उत्तरेला असून मुंबइच्या मूळ बेटाच्या सीमेवर होते म्हणून याला शीव नाव पडले इंग्रजांनी त्याचे सायन केले.
४. बोरिवली -
बोरिवली ह्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम महिकावती बखरीत आढळतो.ह्या परिसरात असलेल्या बोराच्या झाडांवरून याला बोरिवली हे नाव पडले.
५. भायखळा -
इंग्रजी शासनकाळात भायखळा परिसरात गव्हाची गोदाम होती त्याला मराठीत खळी म्हणत तसेच त्याचा मालक भाई नावाचा व्यक्ती होता म्हणून भाईच्या खळी चे भायखळा झाले.
६. कॉटनग्रीन-
ह्याभागात पूर्वी कापड गिरण्यांसाठी लागणारा कापूस साठवला जायचा तसेच हा भाग पूर्वी बराचसा गवताळ होता त्यामुळे ह्याला कॉटनग्रीन नाव पडले.
७.चोर बाजार -
मुंबईतील प्रसिद्ध चोर बाजारात कोणतेही चोरीचे सामान विकले जातं नाही त्याचे जुने नाव ‘शोर’ बाजार असे होते कारण हा परिसर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत गजबजलेला असायचा त्यामुळे नेहमी तेथे प्रचंड ‘शोर'(गलबलाट) असायचा यामुळेच याला शोर बाजार नाव पडले. व इंग्रजांनी त्याच बारस चोर बाजार केल तेच पुढे प्रचलित झालं.
८. कुर्ला-
आगरी भाषेत कुर्ला म्हणजे खेकडा ह्या भागात पूर्वी खेकडे बऱ्याच प्रमाणात विकले जायचे म्हणून ह्याला कुर्ला हे नाव पडले.
९. ग्रांट रोड -
ग्रांट रोडचा परिसर हा इंग्रज काळात अविकसित होता गव्हर्नर रोबर्ट ग्रांट ने ह्या भागाचा विकास केला व येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारले यामुळे त्याला व या संपूर्ण परिसराला रोबर्ट ग्रांट ह्यांचे नाव मिळाले.
१०.माहीम-
मुंबईच्या मूळ सात बेटापैकी एक माहीमचा कसबा हा एक प्राचीन व ऐतिहासिक कसबा आहे. माहीमचे जुने नाव महिकावती. हे एक साम्राज्य होते राजा बिंब येथे राज्य करीत होता त्याचा कालखंडात महिकावतीची बखर लिहिली गेली हि महाराष्ट्रातील पहिली बखर आहे.त्यातून मुंबईतील वसई बोरिवली या गावांचे उल्लेख आढळतात. यामुळे माहीमला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे.
११. फोर्ट-
मुंबई आंदन म्हणून मिळाल्यावर इंग्रजांनी वर्षाला दहा पाउंड इतक्या भाड्याने ती इस्ट इंडिया कंपनीला दिली. सात बेटापैकी मुंबईच्या बेटावर इंग्रजांनी मराठ्यांच्या भीतीने सर्व झाडें नष्ट करून खुल्या मैदानात एक किल्ला बांधला त्यालाच फोर्ट असे म्हणतात
पुढे भारतभर कम्पनी सरकारचे राज्य आल्यावर हा किल्ला पडून त्याचे भूखंड पाडले गेले व फोर्टला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले हा किल्ला अपोलो बंदर पासून चर्चगेट पर्यंत होता.
१२.आझाद मैदान-
फोर्टच्या आजुबाजूला अनेक मोकळी गवताळ मैदान होती त्यापैकी आझाद मैदान हे एक होत त्याला पूर्वी इंग्रज गोवलिया टॅंक म्हणायचे कारण येथे गवळी लोक गायी चरायचे पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांच्या सभा ह्या मैदानात झाल्या व भारत छोडो आंदोलन ह्याच मैदानावर झाल्याने ह्याला आझाद मैदान हे नाव पडले.
१३.दादर -
मराठीत दादर म्हणजे जिना.पूर्वी माहीम व परळ या बेटाना जोडन्याकरिता लोकांनी बंधारा बांधला त्याला दादर असे म्हणायचे तेव्हा हेच नाव रूढ झाले.
१४.चर्चगेट-
मुंबईच्या किल्ल्याला तीन प्रवेशद्वार(gates) होती 1.अपोलो गेट,2.बाजार गेट, 3.चर्चगेट.
तिसऱ्या गेटच्या बाजूलाच चर्च असल्याने ह्या परिसराला चर्चगेट नाव पडले.
१५. मरीन लाईन्स-
सध्याच्या मेट्रो सिनेमा ते बॉम्बे हॉस्पिटल या दरम्यान पूर्वी एक लष्करी छावणी होती जिला मरीन बटालियन्स लाईन्स म्हणायचे पुढे तेथे सुसज्ज वसाहत निर्माण झाली व त्याला मरीन लाईन्स हे नाव पडले.
१६. लोअर परळ-
इंग्रजांनी सध्याच्या धारावी ते लाला लाजपताराय मार्ग या दरम्यान एक बंधारा बांधला यामुळे समुद्राचे पाणी बंद होऊन एक नवीन भूखंड निर्माण झाला वरळीच बेट व परळच बेट या दरम्यान असलेल्या या नवीन भुभागाला लोअर परळ असे नाव दिले कारण हा भुभाग परळच्या बेटापेक्षा थोडासा खाली होता.
१७. वांद्रे-
वांद्रे या नावाचा उल्लेख माहिकावतीच्या बखरीत अढळतो पोर्तुगीज राजवटीत वांद्र्याचं बांदोरा झालं पुढे इंग्रजांनी त्याच बांद्रा केल.
१८. खार-
वांद्र्याच्या २५ पाड्यांपैकी एक खार याच नाव हे त्याच्या उत्तरेला व पश्चिमेला असणाऱ्या मिठागारांवरून पडले तेथे काम करणारे कोळी बांधव येथे राहत म्हणून याला खार हे नाव पडले.
१९. सांताक्रूझ-
सांताक्रूझ च्या एका छोट्याश्या टेकडीवर एक क्रॉस ख्रिस्ती लोकांनी बसवला होता.असं म्हणतात कि त्याला पालवी फुटली यामुळे तो क्रॉस पवित्र झाला व त्या परिसराच नाव सांताक्रूझ पडले.सांताक्रूझ नावाचा अर्थ पवित्र क्रॉस असा होतो.जगभरात अनेक ठिकाणाची नाव सांताक्रूझ आहेत.
२०. चेंबूर -
ट्रॉम्बे बेटाच्या वायव्ये ला चेंबूर होत. चेंबूर या शब्दाची व्युत्पत्ती चिंबोरी यापासून झाली असावी याचा अर्थ मोठा खेकडा असा होतो.
२१. गिरगांव -
पूर्वी मुंबईची मदार हि कापड गिरण्यांवर होती.यामुळे मुंबईत गिरगांव कॉटनग्रीन या सारखे भाग विकसित झाले कपडगिरण्यात लागणारे मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळ हे मुंबईच्या या भागात वसवलं गेलं. मुंबई विकास प्राधिकरणाच्या चाळी या गिरगांवात उभ्या राहिल्या गिरणी कामगारांचे गिरणगावाचे पुढे जाऊन गिरगांव झाले.
माहिती संकलक - हितेश चव्हाण
संदर्भ
www.google.com
Gosht mumbaichi yutube series by loksatta
सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा.
संपर्क- chavanhitesh63@gmail.com
२४-९-२०२५©copyrighted content
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM
Comments
Post a Comment