Posts

Showing posts with the label marathi language

रोजच्या व्यवहारातील इंग्रजी शब्दांचे काही मराठी पर्यायावाचक शब्द

Image
माझ्या मराठीचीये काय बोलू कवतुके|परी अमृतातेही पैजासी जिंके||  संत ज्ञानेश्वरांच्या वरील ओळी मराठी भाषेचा यथार्थ गौरव करतात. याच मराठी भाषेत आपण इंग्रजी भाषेतील अनेक शब्द लादून ते मराठी शब्द असल्यासारखेच वापरतो. इंग्रजीभाषेतून मराठी भाषेत आलेल्या व प्रचलित झालेल्या शब्दांचे मराठी शब्द पुढील प्रमाणे. १)पेन - लेखणी. २)रिफील- दौत . (भारतात संगणक येण्यापूर्वी अनेक वर्षांपासून बोरुची लेखणी व शाईचा दौत  लिहिण्यासाठी वापरण्याचा रिवाज होता इंग्रजी राजवटीत शाईच्या पेनाच्या शोधामुळे क्रांती घडली परंतु दौत कायम राहिला. दौतीतील शाई संपली कि पुन्हा भरावी लागे. लिहिताना कपडे हात इत्यादी खराब होऊ नये म्हणून दौत, लेखणी यांच्या जोडीला टिपकागद असे. आधुनिक युगात पेनाचे स्वरूप बदलले व वापरा आणी फेकून द्या या तत्वावर दौतीचे स्वरूप बदलून तिची रिफील झाली परंतु दोघांचा उद्देश सारखा असल्याने रिफीलीस दौत म्हणता येईल असे मला वाटते ) ३)बँक -  अधिकोष. ४)इंटरनेट - आंतरजाल. ५) कीबोर्ड - कळफलक. ६) व्हिडीओ - चलचित्र . ७)कॅमेरा- छायाचित्रक . ८)फोटो - प्रकाशचित्र, छायाचित्र. (पूर्वीच्या काळी छा...