रोजच्या व्यवहारातील इंग्रजी शब्दांचे काही मराठी पर्यायावाचक शब्द
माझ्या मराठीचीये काय बोलू कवतुके|परी अमृतातेही पैजासी जिंके||
संत ज्ञानेश्वरांच्या वरील ओळी मराठी भाषेचा यथार्थ गौरव करतात. याच मराठी भाषेत आपण इंग्रजी भाषेतील अनेक शब्द लादून ते मराठी शब्द असल्यासारखेच वापरतो. इंग्रजीभाषेतून मराठी भाषेत आलेल्या व प्रचलित झालेल्या शब्दांचे मराठी शब्द पुढील प्रमाणे.
१)पेन - लेखणी.
२)रिफील- दौत.
(भारतात संगणक येण्यापूर्वी अनेक वर्षांपासून बोरुची लेखणी व शाईचा दौत लिहिण्यासाठी वापरण्याचा रिवाज होता इंग्रजी राजवटीत शाईच्या पेनाच्या शोधामुळे क्रांती घडली परंतु दौत कायम राहिला. दौतीतील शाई संपली कि पुन्हा भरावी लागे. लिहिताना कपडे हात इत्यादी खराब होऊ नये म्हणून दौत, लेखणी यांच्या जोडीला टिपकागद असे. आधुनिक युगात पेनाचे स्वरूप बदलले व वापरा आणी फेकून द्या या तत्वावर दौतीचे स्वरूप बदलून तिची रिफील झाली परंतु दोघांचा उद्देश सारखा असल्याने रिफीलीस दौत म्हणता येईल असे मला वाटते )
३)बँक - अधिकोष.
४)इंटरनेट - आंतरजाल.
५) कीबोर्ड -कळफलक.
६)व्हिडीओ - चलचित्र.
७)कॅमेरा- छायाचित्रक.
८)फोटो -प्रकाशचित्र, छायाचित्र.
(पूर्वीच्या काळी छायाचित्रकात आजच्या इतकी प्रगती नव्हती त्यामुळे छायाचित्र हे कृष्णधवल रंगाचे छायेसारखे यायचे म्हणून ते छायाचित्र. पुढे रंगीत छायाचित्राला प्रकाशचित्र म्हणता येईल.)
९)ब्लॅक अँड व्हाईट- कृष्णधवल.
१०)सिमेंट - संधानक.
११)ऑडिओ विज्युअल - दृकश्राव्य.
१२)स्ट्रेचर - रुग्णशिबिका.
१३)डायरी -रोजनिशी.
१४)मोबाईल - भ्रमणध्वनी.
१५)कॉम्प्युटर, लॅपटॉप- संगणक.
१६)ए.सी.- वातानुकुलीत.
१७)चेक- धनादेश.
१८)टेलिफोन- दूरध्वनी.
१९)ऑपरेशन,सर्जरी- शल्यचिकित्सा,शास्त्रक्रिया.
२०)सर्जन - शल्यचिकित्सक.
२१) डॉक्टर - वैद्य.
२२)ऍम्ब्युलन्स- रुग्णवाहिका.
★क्रिकेट शी संबंधित संज्ञा(term) व त्यांचे मराठी शब्द.
२३)बॅट- चेंडूफळी.
२४)बॉल - चेंडू.
२५)अंपायर - पंच.
२६)पीच- खेळपट्टी.
२७)फिल्डिंग- क्षेत्ररक्षण.
२८)बॅटिंग- फलंदाजी.
२९)बॉलिंग- गोलंदाजी.
३०)फास्ट बॉलर - वेगवान गोलंदाज.
४०)स्पिन बॉलर - फिरकी गोलंदाज.
४१)बाउंस - उसळी.
४२)स्पिन- फिरकी.
४३)मिडीयम पेसर- मध्यमगती गोलंदाज.
४४)इंटररप्शन- व्यत्यय.उदा. पावसाचा व्यत्यय(rain interruption)
४५)फिल्डर - क्षेत्ररक्षक.
४६)मॅच- सामना., टूर्नामेंट- स्पर्धा.
४७)टॉस- नाणेफेक.
४८)विकेट किपींग- यष्टीरक्षण.
४९)विकेट कीपर- यष्टीरक्षक.
५०)स्टम्पड/स्टंपिंग- यष्टीचित.
५१)हिटविकेट -स्वयंबाद.
५२)रिटायर्ड हर्ट - निवृत्त.
५३)टाइम आऊट- बाह्यवेळ./अतिरिक्त वेळ.(सामन्याच्या एकूण वेळेव्यतिरिक्त अधिकचा वेळ जो सामन्याच्या वेळेमध्ये धरत नाहीत.)
५४) टेस्ट मॅच- कसोटी सामना.
५५)ODI- एकदिवसीय सामना
५६)T20I - मर्यादित षटकांचा/षटकांचे सामना/सामने.
५७)लीग टूर्नामेंट- साखळी स्पर्धा.
५८)डोमेस्टिक टूर्नामेंट- देशांतर्गत स्पर्धा.
५९)इंटरनॅशनल टूर्नामेंट- अंतरराष्ट्रीय स्पर्धा.
६०)रन आऊट- धावचीत.
६१)LBW-पायचीत.
६२)रिव्हयू- पुन:परीक्षण.
६३)सेंचुरी- शतक.
६४)हाफ सेंचुरी - अर्धशतक.
६५)वर्ल्ड कप - विश्वचषक.
६६)कॅप्टन - कर्णधार.
६७)व्हाईस कॅप्टन.- उपकर्णधार.
६८)फिजिओ- निसर्गउपचारक/भौतिकउपचारक.(physiotherapist)
६९)कोच-प्रशिक्षक.
७ ०) सिलेक्टर्स- निवड समिती.
★
७१)मेल - पत्र.
७२)ई मेल - संगणकीय पत्र/आंतरजालीय पत्र.
७३)फर्स्ट एड-प्रथमोपचार.
७४)F.I.R.- प्रथम माहिती अहवाल.
७५)टेबल- मेज.
७६)चेअर-खुर्ची.
७७)रिपोर्ट-अहवाल.
७८)न्यूजपेपर- वर्तमाणपत्र.
७९)टायटल/हेडिंग- शीर्षक.
८०)सब टायटल- उप शीर्षक
८१)GR- शासकीय अध्यादेश.(गव्हर्मेंट रेसोलुशन.)
८२)फी -शुल्क.
८३)कन्सेशन/डिस्काउंट- सवलत.
८४)ट्रस्ट - संस्था.
८५)ट्रस्टी- कार्यकारी मंडळ.
८६)हॉटेल- उपहारगृह.
८८)हॉस्टेल-वसतिगृह.
८९)जेल-कारागृह/तुरुंग.
९०)डिव्हायडर- दुभाजक.
९१)सिग्नल- संकेत.
९२)लेन- पदर (सिंगल लेन रोड =एकपदरी रस्ता.)
९३)पासपोर्ट-पारपत्र.
९४)लाईनमन- विजतंत्री.
९५)इंजिनिअर-अभियंता.
९६)क्लेम-दावा.
९७)इमेज-प्रतिमा.
९८)पासवर्ड-सांकेतिक शब्द.
९९)झेरॉक्स- प्रतिमुद्रा.
१००)टेपरेकॉर्डर- ध्वनीमुद्रक.
१०१)प्रिंटर- मुद्रक.
१०२)प्रिंट-मुद्रा.
१०३)ऑपरेटिंग सिस्टिम- कार्यप्रणाली.
माहिती संकलन- हितेश चव्हाण.
©८-७-२०२५copyright.
संपर्क:-chavanhitesh63@gmil.com
★ विशेष सूचना :वरील लेखाचे संकलन हे गुगल वरील माहितीच्याद्वारे व काही वयक्तिक संशोधनातून केलेले आहे. लेखातील दुरुस्ती,आक्षेप इत्यादीबाबतच्या सूचना स्वागतार्ह आहेत तरी काही चुका आढळून आल्यास/ काही शब्द चुकीचे आढळल्यास/आक्षेप असल्यास संदर्भासह ती चूक इमेल द्वारे लक्षात आणून द्यावी.संदर्भाची सत्यता पडताळून ती दुरुस्त केली जाईल.संदर्भ नसल्यास ती चूक दुरुस्त केली जाणार नाही.
लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.
Comments
Post a Comment