गणपतीचा गाऱ्हाणा

“बा देवा गणपती गजानना शिव गौरीच्या तनया रिद्धी सिद्धीच्या दाता!"
व्हय महाराजा!
सालाबाद प्रमाणे यंदाही आम्हा सर्वांनी तुजी स्थापना केलेली असा ती मान्य करून घे महाराजा! 
व्हय महाराजा!
त्यात काय कमी रव्हली असात तर ती पोटात घे आणी सर्वांका शेतीत आणी कामाधंद्यात यश दे रे महाराजा!
व्हय महाराजा!
हे अकरा दिवस तुज्या दर्शनाक जे जे भक्तजन येतलंत त्यांका सुख समृद्धी समाधान मिळानदे चाकरमान्यांका नोकरीं व्यवसायात यश दि पोराटोरांका शिक्षणात सुयश दे रे महाराजा! 
व्हय महाराजा!
हय ता आमच्या साखरप्या चो रसतो कित्येक वर्षा झाली खड्डेमय असा 
त्याचा बरोबर मुंबई गोवा हायवे पण काही ठिकाणी भंगलो असत सरकारका तो दुरुस्ती करण्याची सद्बुद्धी दे रस्तो ठीक नाय केल्यानी तर या सरकारवर पटकी येवंदे दे रे महाराजा!
व्हय महाराजा!
दरवर्षी कोकण रेल्वेने चाकरमानी आरक्षण करान तुज्या सनासाठी येत असतात पण त्यांका तिकिट गावात नाय  ह्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार व्हता त्या काळोबाजार करणार्यांवर पटकी येवंन्दे रे महाराजा!
व्हय महाराजा!
 आजकाल मराठी माणसाने मराठी बोलना कमी केलेला आसात यामुळे परप्रांरतीय महाराष्ट्रात येऊन मराठी भाषिकांवर अन्याय दादागिरी करतत तर या आपल्या मराठी माणसाक मराठी बोलण्याची सद्बुद्धी दे आणी ह्या कोकणाबरोबरच अखंड महाराष्ट्राचो विकास होऊंदे रे महाराजा!
व्हय महाराजा!
कोकणातलो मानुस  हल्ली आपली सोन्यासारखी जमीन विकता त्यांका 
सद्बुद्दी दि आणी यावर्षीप्रमाणे पुढल्याही वर्षी  तुझी सेवा अशीच घडूदे त्याचे बळ दे रे महाराजा 
व्हय महाराजा!
गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!

लेखक हितेश 
३०-८-२०२५©copyrighted content 
लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी