आजी

नमस्कार माझं नाव हितेश आज मी तुमच्या समोर मी लिहिलेली आजी ही कविता सादर करतोय. 
                        आजी.
आजी म्हणजे आजी म्हणजे आजी असते,
तिच्यासारखी प्रेमळ व्यक्ती जगात दुसरी नसते||धृ||

मुलांपेक्षा जीव तिचा नातवंडांवर असतो,
त्यांच्यासाठी जीव तिचा तीळ तीळ तूटतो||१||

नातवंडांच्या आजारपणात चिंताग्रस्त असते ती,
बालपणीच्या लीला आठवून मंद गोड हसते ती,
आजी म्हणजे अनुभवाचा फार मोठा बटवा असतो 
किती केला रिता तरी तो संपता संपत नसतो||२||

लांब असतील नातवंड तर आठवणीने व्याकुळ होते,
जवळ येताच त्यांच्यावर मायेचा वर्षाव करते,
स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करते ती,
सर्वांशी मिळून मिसळून हसत खेळत राहते ती||३||

एक वेळ नकळत अचानक अशी येते,
लाडकी आजी आपल्याला सोडून दूर निघून  जाते,
मागे राहते आठवणींचे न संपणारे पोते||४||

म्हणून म्हणतो आजी-आजोबांना फक्त प्रेम हवं असत,
ते गेले देवाघरी तर आपल्या हाती फक्त;
रडत बसणं असत,फक्त रडत बसणं असत ||५||
- हितेश.

२७-८-२०२५©copyrighted content 
लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.




Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी