शिवरायांनी उल्लेखलेली चौऱ्याऐंशी बंदरे आणी अठरा टोपीकर

नमस्कार माझं नाव हितेश आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यसीमा विस्तारत असताना गुजरातमधील सुरत ते कर्नाटकातील बसरूर या दरम्यान एकूण चौर्याऐंशी बंदर असल्याचे माहिती होते तसेच त्याकाळात १८ परकीय व्यापारी स्वराज्याच्या सीमेभोवती घोंगावत होते तर त्या चौर्याऐंशी बंदर व अठरा टोपीकर यांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

मालवण जिंकून स्वराज्यात आल्यावर मालवण किनारी फिरत असता समुद्रात महाराजांना एक बेट दिसले राजांनी त्याचे नाव विचारले तेव्हा त्यास कुरटे म्हणतात असे असे समजले.शिवरायांनी कुरटे बेट पाहून म्हंटले चौऱ्याऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही, इथं बंदरी नूतन जंजिरा वसवावा.चित्रगुप्ताच्या बखरीत सिंधुदुर्गाबद्दल आणि त्याच्या महतीबद्दल अतिशय सुंदर वर्णन केलं आहे –
चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा. जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन, तैसा महाराजांचे राज्याचा भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल कि महाराजांना सिंधुदुर्ग बांधण्यापूर्वी  तसेच मराठा अरमाराची शिवरायांच्या नेतृत्वातील बसरूर ची पहिली स्वारी या दरम्यान महाराजांना मालवण ते बसरूर या दरम्यान एकूण चौर्याऐंशी बंदर असल्याचे ज्ञात होते. याला पुरावा म्हणजे शिवरायांच्या पदरी असलेले कवींद्र परमानंद यांच्या शिवभारत या संस्कृत ग्रंथातील दहाव्या अध्यायात श्लोक ३४ ते ४० यामध्ये खालील विद्या महाराजांना त्यांच्या गुरूंनी शिकवल्याचे उल्लेख आहेत.
)श्रुती २)स्मृती ३)पुराणे ४)भारत ५)राजनीती ६)सर्व शास्त्रे ७)रामायण ८)काव्य ९)व्यायाम १०)वास्तुविद्या ११)फलज्योतिष्य १२)सांगधनुर्वेद १३)तसेच सामुद्रिक १४)निरनिराळ्या भाषा १५)पद्य १६)सुभाषित १७)हत्ती घोडे व रथ ह्यावरून बसणे १८) तसेच त्यांची लक्षणे १९)त्यावर चढणे व उतरणे,दौड मारणे,उडी मारणे २०)दुर्ग अभेद्य(दुर्गम) करणे.२३)दुर्लक्ष्य निशाण वेधणे २४)दुर्गम संस्थानातून निसटून जाणे २५)इंगित जाणणे २६)जादूगिरी २७)विष उतरणे २८)नाना प्रकारची रत्नपरीक्षा २९) अवधाने ह्या सर्व विद्या,शास्त्रे,कला ह्यांमध्ये स्वतः पारंगत होऊन सर्व गुरुस मोठे यश दिले- श्रीशिवभारत. अध्याय १०.श्लोक ३४ते४०.
त्या विनायशील व गुणवान शिवाजीराजांच्या पदरी असलेले गुरु कृतार्थ झाले-श्रीशिवभारत.अध्याय१०.श्लोक३३.
 यावरून महाराजांना समुद्रविद्येचे ज्ञान होते व त्यावरून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यास सिंधुसागरावरून सिंधुदुर्ग नाव दिल्याचे लक्षात येईल आता आपण ती चौर्याऐंशी बंदरे पाहुयात.
 सिंधुसागरावरील सुरत ते बसरूर दरम्यान असणारी एकूण चौर्याऐंशी बंदरे व नद्या.
१) सुरत-तापी.
२)दमण-दमणगंगा.
३)डहाणू-सिंधुसागर.
४)चिंचणी-सिंधुसागर.
५)तारापूर-सिंधुसागर.
६)केळवे-सिंधुसागर.
७)अर्नाळा-वैतरणा.
८)सोपारा-सिंधुसागर.
९)वसई-उल्हास.
१०)घोडबंदर-उल्हास.
११)कल्याण-उल्हास.
१२)मुंबई-सिंधुसागर.
१३)मोरा-सिंधुसागर.
१४)कारंजा-सिंधुसागर.
१५)रेवस-पाताळगंगा.
१६)दासगाव-सावित्री.
१७)आंबेत-सावित्री.
१८)बाणकोट-सावित्री.
१९)अष्टमी-सिंधुसागर.
२०)केळशी-भारजा.
२१)आंजर्ले-जोग.
२२)हर्णे-सिंधुसागर.
२३)चिपळूण-वासिष्टी.
२४)दाभोळ-वासिष्टी.
२५)वेलदूर-वासिष्टी.
२६)गुहागर-सिंधुसागर.
२७)तवसाळ-शास्त्री.
२८)नायरी-बाव.
२९)संगमेश्वर-बाव.
३०)मिऱ्या-काजळी.
३१)साटवली-मुचकुंदी.
३२)काद्रा-काली.
३३)कारवार-काली
३४)अंकोला-सिंधुसागर.
३५)गोकर्ण-गंगावली.
३६)मिरजन-सिंधुसागर.
३७)मूरगाव-सिंधुसागर.
३८)विजयदुर्ग-शुक.
३९)पेण-सिंधुसागर.
४०)मालवण-सिंधुसागर.
४१)ठाणे-उल्हास.
४२)पालशेत-सिंधुसागर.
४३)जयगड-सिंधुसागर.
४४)शिरोडा-सिंधुसागर.
४५)दातिवरे-सिंधुसागर.
४६)दिघी-सिंधुसागर.
४७)सासवणे-सिंधुसागर.
४८)पनवेल-सिंधुसागर.
४९)मांडवा-सिंधुसागर.
५०)अलिबाग-सिंधुसागर.
५१)अक्षी-सिंधुसागर.
५२)नागोठणे-अंबा.
५३)रेवदंडा-कुंडलिका.
५४)चौल-कुंडलिका.
५५)रोहा-कुंडलिका.
५६)म्हसळे-सिंधुसागर.
५७)राजपुरी-सिंधुसागर.
५८)नानवली-सिंधुसागर.
५९)श्रीवर्धन-सिंधुसागर.
६०)बागमांडला-सिंधुसागर.
६१)महाड-सावित्री.
६२)राजापूर-अर्जुना.
६३)जैतापूर-अर्जुना.
६४)खारेपाटण-शुक.
६५)गिर्ये-शुक.
६६)देवगड-सिंधुसागर.
६७)आचरा-सिंधुसागर.
६८)निवती-सिंधुसागर.
६९)वेंगुर्ले-सिंधुसागर.
७०)रेडी-सिंधुसागर.
७१)बांदा-तेरेखोल.
७२)गोवा-सिंधुसागर.
७३)होनावर-काली.
७४)गंगोकी-काली.
७५)मंगळूर-काली.
७६)कीहिम-सिंधुसागर.
७७)थळ-सिंधुसागर.
७८)काशीद-सिंधुसागर.
७९)अंजनवेल-सिंधुसागर.
८०)साखरी-वसिष्टी.
८१)बुरुंडी-सिंधुसागर.
८२)कुडे-सिंधुसागर.
८३)आवास-सिंधुसागर.
८४)बसरूर-सिंधुसागर.
आता आपण शिवकालीन निरनिराळ्या दिशांतील परकीय टोपी वापरणारे अठरा व्यापारी पाहू त्यांना शिवकाळात टोपीकर म्हणायचे.
नऊ दिशातील वेगवेगळ्या टोप्या वापरणारे परकीय व्यापारी.
१)फिरंगी-क्रिस्त-किरीस्तांव-पोर्तुगीज-पोर्तुगाल.
२)इंगरेज-इंग्रज-इंग्लंड.
३)वलंदेज-डच-हॉलंड.
४)फारासिस-फ्रेंच-फ्रांस.
५)दिनमार्क-डिंगमार-दिडमार-डेन्मार्क.
६)निविशयान-नॉर्वेजिअन-नॉर्वे.
७)ग्रेग-यवन-ग्रीक.
८)लतियान-लॅटीअन-तलियना-इटालिअन-यहूदीन-ज्यू.
९)कसतल्यान- शंटलंडियन.
१०)विअज-वेनेशीअन-सुवेस-सुईस-स्विस.
११)प्रेमरयान-पोमॅरॉनिअन.
१२)जनामारी-जर्मन.
१३)अरमान-आर्मनिअमी.
१४)रुमियान-रून-तुराणी-तुर्की-रुमानिअन.
१५)हबसी-सिद्दी-ऍबेसेनिअन.
१६)इस्तंबील-इस्तंबुल.
१७)मोरस-मॉरीशिअस देशातील.
१८)अरब.

माहिती संकलक/लेखक
-हितेश चव्हाण 
*संदर्भ व साभार
सिंधुदुर्ग-श्री आप्पा परब.
सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा.
संपर्क-GMAIL 
२२-२-२०२६ १:१३am.©copyrighted content 
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी