आधुनिक युगातील 'तुकाराम'

माझ्या आदर्श व्यक्तिमत्वांच्या यादीतील एक असलेले २००५ च्या महाराष्ट्र केडर चे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत(UPSC) देशातून विसावी श्रेणी धारण केलेले  व सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम हरिभाऊ मुंढे यांचं आत्मचरित्र दिनांक १७ जुलै २०२५ ला पुण्यात प्रकाशित झालं. पण त्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती मला त्याबद्दल चार दिवसांनी समजलं.आणी लगेच मी ते पुस्तक मागवलं.हे पुस्तक वाचून खरंतर मी निशब्द झालो परंतु या पुस्तकाबाबत लिहिण्याची सुप्त इच्छा मला गप्प बसू देत नव्हती;कारण पुस्तक इतक प्रभावी आणी दर्जेदार आहे की मी स्वतःला लिहिण्यापासून थांबवू शकलो नाही.
 लेखक शफी पठाण यांनी लिहिलेल्या ‘तुकाराम' या मुंढे साहेबांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन दिनांक १७ जुलै २०२६ रोजी झाले असून त्याची प्रथमावृत्ती १७ जुलै २०२६ रोजी तर सव्वीसावी आवृत्ती १८ जुलै २०२६ रोजी प्रकाशित झाली.जी माझ्याकडे आहे. पुस्तकाला प्रस्तावना तुकाराम मुंढे यांचे ज्येष्ठ बंधू  माजी अप्पर जिल्हाधिकारी श्री. अशोक मुंढे यांची आहे.पुस्तकाच्या मुखपृष्ठमलपृष्ठाचे रेखांकन ख्वाजा सय्यद यांनी केले असून पुस्तकाची अंतर्गत मांडणी रत्नेश चोरगे यांनी तर मुद्रितशोधन संजय पवार यांनी केले आहे.तसेच या पुस्तकाचे प्रकाशन न्यू इरा पब्लिशिंग हाऊस या संस्थेने केले आहे.पुस्तकाची अधिकतम विक्री किंमत(MRP)₹२५० आहे.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुकाराम मुंढे यांची प्रसन्न मुद्रेतील प्रतिमा छापली आहे त्याखाली मधोमध 
पुस्तकाचे शीर्षक व लेखकांचे नाव आहे. उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूस प्रकाशन संस्थेचे प्रतीक चिन्ह(logo) मुद्रित आहे.पुस्तकाच्या मलपृष्ठावर मध्यभागी शीर्षक व लेखकाचे नाव व खाली मुंढे साहेबांच्या बालपणीचा प्रसंग सांगणारे दोन उतारे मध्यभागी आहेत त्याच्या खाली प्रतीक चिन्हासह प्रकाशन संस्थेचे नाव व बाजूला ISBN क्रमांकासह मूल्य छापलेले आहे.
  लेखक शफी पठाण यांचे हे पहिलेच पुस्तक असले तरी त्याचा दर्जा व गुणवत्ता अतिशय उच्चं आहे पुस्तकात फारसा अलंकारिक भाषेचा उपयोग केलेला नाही.पुस्तकात आवश्यकतेनुसार संत तुकारामांचे अभंग प्रसंगनुरूप योग्य ठिकाणी वापरले आहेत. तुकाराम मुंढे साहेबांच्या आयुष्यातील प्रसंग अतिशयोक्ती न करता जसंच्या तसें मांडले आहेत. मात्र हे करत असतानाच त्यांनी केलेल्या चुकांचे परखड पणे विश्लेषण करून त्यांचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षा देऊ पाहणाऱ्या युवा वर्गास त्यांनी तुकाराम मुंढेंपासून प्रेरणा घेऊ पाहणाऱ्यांनी त्यांनी केलेल्या चुकांमधून बोध घेण्यास सांगितले आहे.त्यांचे चरित्र अभ्यासत असताना काय करावे याचसोबत काय करू नये याचेही भान ठेवावे तसेच एक प्लॅन फसल्यास दुसरा प्लॅन बी तयार ठेवावा हेही अगदी परखडपणे सांगितले आहे.यामुळेच या पुस्तकाचा दर्जा उंचावला आहे.
 लेखकाने आपल्या मनोगतात ज्याप्रमाणे संत तुकारामांच्या वाट्याला अनंत अडचणी अनेक संकट आली पण त्यांनी आपल्या निर्भीड वाणीतून समाजातील दंभावर आघात करून समाज सेवेचा वसा कायम ठेवला त्यांचाच वारसा घेऊन तुकाराम मुंढे चालत आहेत कारण मुंढेच्याही आयुष्यात संघर्ष हा लहानपणापासून पाचवीस पूजलेला होता मात्र तरीही ते डगमगले नाहीत.केवळ तुलना म्हणून नव्हे तर वैचारिक निष्ठा जपण्याच्या वृत्तीमुळे पुस्तकाचे शीर्षक ‘तुकाराम' ठेवल्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे मी हि या लेखाचे शीर्षक अधुनिक युगातील तुकाराम असे ठेवले आहे.
  एकंदरीत ‘तुकाराम' हे पुस्तक  एकूण युवा वर्गास व प्रामाणिकपणे देशसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणाईस दिपगृहाचे काम करेल पण केव्हा जेव्हा युवा वर्ग कुण्या एकाच्या सांगण्यावरून आपली माथी भडकावून न घेता राजकारण न करता काय चूक व काय बरोबर याचा सद्सत विवेकबुद्धीने विचार करेल. आणी देशहितास प्राध्यान्य देऊन देशहितास लाभदायक काम करेल/करण्याचे ठरवेल तेव्हा हे पुस्तक नक्कीच दिपगृहाच काम करेल अन्यथा ते केवळ सुई नसलेलं होकायंत्र असेल. भारताचे माजी पंतप्रधान श्री.अटलबिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील भाषणातील एक वाक्य मुद्दाम येथे नमूद करावंस वाटत ते एकदा संसदेत म्हणाले होते “सत्ताए आएंगी जाएंगी पर्टियां बनेंगी बिघडेंगी मगर ये देश रहना चाहिए।”अर्थात राजकारण होत राहील सरकार बनतील बिघडतील पण देशहित हे सर्वोच्च स्थानावर आहे भारत देश सुरक्षित असला पाहिजे.आजच्या युवा वर्गाने नक्कीच या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिल पाहिजे.
तुकाराम मुंढेंच्या चरित्रतून मी खालील तीन बाबी शिकलो
१) आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येयनिश्चिती हवी व ती साध्य करत असताना एकायोग्य व उत्तम मार्गदर्शकाची साथ हवी. तुकाराम मुंढेंचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू अशोक मुंढे होते त्यांनी गरिबीतून मार्ग काढण्यासाठी शिक्षण हा पर्याय अवलंबून आपल्या दोन्ही भावांना ध्येयपर्यंत पोहोचण्यात मदत व मार्गदर्शन केले.
२)ध्येय गाठत असताना व गाठल्यानंतर अनेक अडचणी येतील त्यांना न घाबरता सामोरे जाणे.( तुकाराम मुंढेंची प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वीच ३वेळा बदली झाली पण त्यांनी धैर्य खचू दिले नाही यादरम्यान त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागलातेव्हा स्वतः ला त्यांनी एकच प्रश्न विचारला ”IF I CAN NOT THEN WHO? उत्तर होत HONEST PEOPLE LIKE YOU!.”)त्यादरम्यान आपल्या हातून घडणाऱ्या चुकांचे विश्लेषण करून आत्मबोध करणे.
३)कोणतेही काम करत असताना नियम,तत्व व नैतिकतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही परिणाम काहीही असोत.

लेखक:- हितेश चव्हाण.
संपर्कgmail
संदर्भ :- 
तुकाराम-शफी पठाण.
सव्वीसावी आवृत्ती-१७/८/२०२६.
गुगल.
सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास दिलेल्या ईमेल आयडी वर मेल करावा.
११-८-२०२६ १:१३am.©copyrighted content 
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.

Comments

Popular posts from this blog

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

शिवरायांनी उल्लेखलेली चौऱ्याऐंशी बंदरे आणी अठरा टोपीकर