दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी
☝️पहिल्या भागाची लिंक
मोरेंचा इतिहास,छत्रपती शिवराय व जावळी,जावळीच्या मोऱ्यांचे प्रभावळीतील इतर सरदारांशी असलेले सहसंबंध,व रायरीचा दुर्गराज रायगड होण्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत.
चंद्रराव मोरेंचा इतिहास
:-
चंद्रगुप्त मौर्य याच्या काळात मौर्य सम्राज्याचा विस्तार दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणात त्याच्या मृत्युंनंतर बिंबीसार हा राजगादी वर आला मात्र बिंबीसाराच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये गादीसाठी एकच नरसंहार झाला त्याच्या मुलांपैकी एक चंद्रराव मौर्य हा जावळीच्या खोऱ्यात सम्राट अशोकापासून वाचण्याकरिता लपून बसला. त्याकाळात जावळीचे खोरे हे कृष्णा व वारणा नद्यांंकाठी पन्हाळा,विशाळगड ते रायरी महाबळेश्वर असे विस्तीर्ण व घनदाट होते या चंद्ररावाने येथे चंद्रराव मोर्य म्हणून आपले स्वातंत्र्य राज्य साथपन केले चंद्रराव मोर्य हा मोरेंचा घराण्याचा संस्थापक होय.‘मौर्य’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन मोरे हे आडनाव रूढ झाले.गुप्त,शुंग,चालुक्य,यादव, होयसाळ, राष्ट्रकूट, सातवाहन, शिलाहार या राजवाटिंपासून हे मौर्य साम्राज्य जावळी खोऱ्यात राज्य करत होते.
चंद्रराव मौर्यास सहा मुले होती त्यापैकी थोरल्याला आपल्या जवळ ठेऊन बाकी मुलांना जवळीतील प्रदेश नेमून दिला.थोरल्या पिढीत चंद्रराव ते दौलतराव अश्या आठ पिढ्या झाल्या. मोऱ्यांच्या जावळी खोऱ्यातील एक पिढी देहूत स्थायिक झाली. त्यांच्याच पिढीत बोल्होबा व कानकाई या दाम्पत्याच्या पोटी जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला.
चंद्रराव मौर्याच्या पिढ्या ह्या आपल्या नावापुढे ‘चंद्रराव’ हा 'किताब धारण करत. पुढे मोऱ्यांनी बहमणी सम्राज्याची चाकरी पत्करल्या नंतर हि हि प्रथा कायम राहिली.
इसवी सन १४५३ साली पन्हाळा, व खेळणा किल्ल्यांवर घडलेल्या घटनेतुन शिर्के व मोरे यांची ताकत लक्षात येते.इसवी सन १४५३ साली पन्हाळा, व खेळणा किल्ल्यांवर बहामणी सरदार मलिक उददौजार ने आक्रमण केले त्याकाळी पन्हाळा शिर्केॅंकडे तर खेळणा हा मोऱ्यांच्या ताब्यात होता.तसेच शिर्के व मोरे व्याही होते. मलिक उददौजार ने पन्हाळा सहज घेतला तेव्हा शिर्के यांनी मलिक उददोजार ला घाबरून आपण धर्मांतरास तयार आहोत असे भासवून मोऱ्यांच्या ताब्यातील खेळणा हि घेऊन देऊ असे भासवले. खुश होऊन उददोजारने आपले सर्व १२००० सैन्य जावळीच्या दुर्गम घनदाट खोऱ्यात घुसवले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शिर्के व मोरे यांनी मिळून हे सर्व सैन्य कापून काढले मलिक उददोजार हि मारला गेला.बहमणी राजवटीने ह्या घटनेचा खूप मोठा धसका घेतला. मात्र पुढे जाऊन मोरे हे बहामणी राजवटीचे चाकर बनले.
जावळीच्या मोऱ्यांचे प्रभावळीतील इतर सरदारांशी असलेले सहसबंध
:-
त्यावेळी(बहामणी काळ व त्या पुढील आदिलशाहीचा काळ )कोकणात शिर्के,सुर्वे, दळवी हि वतनदार मंडळी होती मोरे यांच्याशी त्यांची जवळीक होती.
छत्रपती शिवाजी महाराज व जावळी
:-
शिवरायांचा व जावळीचा प्रत्यक्ष संबंध हा इसवी सन १४४६ मध्ये तेव्हा स्वराज्य हे सुरुवातीच्या काळात होत शिवरायांची ओळख तेव्हा आदिलशाहीतील एका मातब्बर जहागीरदार शहाजीराजे यांचा मुलगा अशीच होती त्या काळात जावळीवर चंद्रराव म्हणून दौलतराव मोरे व त्याची पत्नी मानकाई हे राज्य करत होता त्या काळात जवळीशेजारी दोन जहागिरी होऱ्या i) शहाजीराजेंची पुणे, सुपे इत्यादी. ii)रण्दुल्लाह खानाची वाई शहाजी राजे व रण्दुल्लाह खान हे मित्र होते. त्या काळात वाईची जहागीर रण्दुल्लाह खान याचा मुलगा रुस्तुम-ए-जमान याच्याकडे होती व तो आणी शिवराय यांचे संबंध मित्रात्वाचे होते.
दौलतरावाच्या मृत्युंनंतर त्याची पत्नी मानकाईस वारस नसल्याने इतर मोरे जहागीरीवर हक्क सांगतील किंव्हा आदिलशहा आपली जहागीर जप्त करेल असे वाटले त्यासाठी तिने यशवंतरावास दत्तक घेतले परंतु
जावळीत होण्याऱ्या बंडाळ्या मोडून काढण्यासाठी तिला पाठिंब्याची आवश्यकता होती त्यासाठी तिने शिवरायांची मदत घेतली शिवरायांनी यशवंतरावास पाठिंबा दिला व यशवंतराव मोरे हा चंद्रराव यशवंतराव मोरे बनला.
यानंतर मोऱ्यांनी काही काळ शिवरायांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले मात्र रण्दुल्लाह खानाच्या मृत्यूनंतर वाईची जहागीर जेव्हा अफझल खानाने ताब्यात घेतली तेव्हा त्याने मोऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले मग मोरे हे हळूहळू शिवरायांचे उपकार विसरून अफझलखानाच्या बाजूने झाले.व स्वराज्यातील प्रदेशात हल्ले करून उपद्रव करू लागले या रागातून राजांनी जावळीवर हल्ला करावा व अफझलखानाच्या मदतीने राजांचा काटा काढावा असा डाव अफझलखानाच्या साथीने मोरेंनी रचला
याची खबर राजांना होतीच मात्र राजे योग्य संधीची वाट बघत होते राजांचे अनेक हेर जावळीत वेशांतर करून वावरत होते. आदिलशहाची प्रकृती अचानक बिघडल्याने अफझलखान हा वाईहून विजापूरास गेला असता त्याची नेमणूक कर्नाटकतील कनकगिरी वर झाली हि संधी पाहताच राजांनी जावळीची मोहीम हाती घेतली.
तत्पूर्वी राजांनी यशवंतराव मोरेंना जरब पत्र व शिळीम्बकरांना अभयपत्र लिहिले.
राजे मोरेंना पत्रात लिहितात.
“तुम्ही मुस्तफंद राजे म्हणविता, खरे राजे आम्ही हे राज्य आम्हाला शंभूने दिले तरी आपणास राजे न म्हणऊन, आमचे नोकर होऊन मुलुख घेऊन राहणे.
मोरचेल,छत्रचामरे बाजोस ठेऊन जावळी खाली करोन हातरूमाले बांधून हुजूराचे भेटीस येणे इतकीयात बदफैली केलीयांस मारले जाल.”
यशवंतरावाने यावर अतिशय गुर्मीत पत्र लिहुन उत्तर दिले.
तो म्हणतो.
“ चंद्रराव आमचा किताब आम्ही पिढीजात राजे. तुम्हास राज्य कोणी दिले मुस्तफंद राजा आपल्या घरी म्हंटल्यावर राजा कोण मानतो.येता जावळी जाता गोवळी दारुगोळा महजुद आहे. एकही पुरुष जिवंत जाणार नाही. उदीयाक येणे कराल तर आजच यावे. काही बेजबाबदार लिहिले ते कश्यास लिहिले थोर समर्थ असो."
हे राजांना थेट आव्हानच होते राजेंनी जावळीची मोहीम आखूनच ठेवली होती मात्र यशवंतरावाने त्याला मिळालेल्या अखेरच्या संधीची हि माती केली.
जावळीच्या मुख्य भागात जिथे राजधानी होती तिकडे त्याकाळात उतरायला दोनच मार्ग होते. रडतोंडीचा घाट व निसणीचा घाट.महाराजांनी आपल्या सैन्याची दोन भागात विभागणी करून मोठा भाग हा रडतोंडीच्या घाटाकडे रवाना केला व दुसऱ्या तुकडीसोबत महाराज अत्यंत अवघड असा निसणीचा घाट उतरून जावळीवर चल करून गेले. आजच्या श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिरापासून अर्थर सीट पॉईंट कडे जाताना दहा मिनिटाच्या अंतरावर हा जुना निसणीचा घाट सुरु होतो.मात्र आजच्या काळात त्याचा वापर हा पूर्णपणे बंद झाला असे पायथाशी असलेल्या दरे गावाचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे हा ट्रेक करताना जाणकार व्यक्ती व स्थानिक ग्रामस्थांसोबतच करावा.
निसणीच्या घाटातील काही प्रकाशचित्र.
निसणीच्या घाटातून दिसणारा प्रतापगड.व दरे गाव.
सर्व प्रकाशचित्रे साभार माऊन्टेन मॅडनेस युट्युब चॅनेल.©कॉपीराईट.
All pictures copyright reserved ©mountain_madness youtube channel's copyrighted picture.
इसवी सन १६५६ ला महाराजांनी जावळी जिंकली व जावळीवर स्वराज्याची भगवा जरीपटका फडकला.परंतु यशवंतराव हा रायरीस पळाला. तो अंगरक्षक मुरारबाजी देशपांडे यांच्यामुळे मुरारबाजींना महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे महाराजांनी रायरीस वेढा दिला यशवंतरावाने तीन महिने निकराचा लढा दिला मात्र महाराजांनी रसद रोखून धरल्याने तो बिनशर्त तहास तयार झाला.व त्या नंतर राजांनी यशवंतरावास व त्याच्या दोन मुलास कैद केले.परंतु यशवंतरावाने मोघलांना लिहिलेली पत्रे राजांना सापडल्याने राजांनी यशवंतरावांना मृत्यूदंड दिला. राजांनी रायरीचा किल्ला स्वराज्यात आला. महाराजांनी रायरीचा किल्ला पाहताच त्यांच्या तोंडी जे उदगार आलेत ते सभासद बखरीत लिहून ठेवले आहे.
सभासद म्हणतो ” राजा खासा जाऊन पाहता, गड बहुत चखोट. चौतर्फ़ा गडाचे कडे तासिल्यासारखे. दीड गाव उंच.पर्ज्यन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादचे दशगुणी उंच, असे देखून संतुष्ट जाहले आणि बोलले तक्तास जागा हाच गड करावा."
आणि रायरीचा रायगड जाहला!
आणी अश्याप्रकारे रायरीचा दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड झाला.
जावळीच्या रण संग्रामात राजांना मुरारबाजी देशपांडे हे रत्न तर रायरी, प्रतापगड सारखे किल्ले व प्रचंड मोठा व महत्वाचा असा भौगोलिक प्रदेश हाती सापडला.
पुढील भागात आपण प्रवासवर्णनातून मी अनुभवलेला रायगड पाहणार आहोत.
माहिती संकलन- हितेश चव्हाण.
©१३-७-२०२५copyright.
संपर्क:-GMAIL- जिमेल
संदर्भ:- काही युट्युब चॅनेल खालील युट्युब चॅनेल्स जरूर सबस्क्राईब करा
3.google.com.
लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.
Comments
Post a Comment