ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

नमस्कार आज आपण अंतरराष्ट्रीय स्तरावर जे ग्रेगोरियन कालगणना(कॅलेंडर) वापरतो मात्र त्याचा इतिहास आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती नसतो तर आज आपण त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत.
         ज्यूलीएट्स सीझर.
ज्यूलीयन कालगणना हि ज्यूलीएट्स सीझर याने पंधराव्या शतकात सुरु केली हि सौर कालगणना होती.अर्थात पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्यास लागणारा काळ हा एक वर्ष धरून त्याचे विभाजन बारा महिन्यात केले गेले.३६५दिवस६तास म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष हे ज्यूलीयन कालगणनेने मान्य केले. 
 मग हि सहा तासांची पोकळी भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी लीप वर्ष मानून एक दिवस म्हणजे २३फेब्रुवारी दोनदा धरला जात होता.परंतु काही कालावधीनंतर लोकांच्या कालगणनेत गडबड असल्याचे लक्षात आले कारण इस्टर हा ज्यूलीयन कालगणनेनुसार २१ मार्चला यायचा पण तो कालगणनेतील एका नजरचुकीमुळे शतकानुशतक मागे जायला लागला.मग सीझर च्या असं लक्षात आल कि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास ३६५दिवस ६तास इतका वेळ नाही लागत.तर तो वेळ हा 
३६५ दिवस ५तास ४८ मिनिट  इतका आहे.
ह्या बारा मिनिटांच्या पोकळीमुळे दर हजार वर्षात आठ दिवस जास्त भरत होते.
         पोप ग्रेगोरी तेरावा.
ह्यावर उपाय म्हणून इसवी सन १५८२ च्या ऑक्टोबर महिन्यात चार तारखेनंतर पाच तारीख न धरता ती पंधरा तारीख धरावी असा बदल तत्कालीन पोप ग्रेगोरी तेरावा याने सुचवला त्याप्रमाणे त्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चार तारखेनंतर पंधरा तारीख आलेली आहे.
 डचांनी हा बदल लगेच स्वीकारला मात्र पूर्वेकडील इंग्रजांनी हा बदल १७७२च्या आसपास स्वीकारला यामुळे सोळाव्या शतकातील इंग्रजी व डच कागदपत्रात एकच घटनेच्या वेगवेगळ्या तारखा व वार यांचे उल्लेख आढळतात.
अश्याप्रकारे सध्याच्या अंतरराष्ट्रीय नागरी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन असा प्रवास दिसून येतो.
माहिती संकलक- हितेश चव्हाण
 सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा.
संपर्क- Gmail
२१-९-२०२५©copyrighted content 
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी