लालपरी

नमस्कार आजची हि कविता महाराष्ट्राच्या लाडक्या जीवनवाहिनी अर्थात एसटी ला समर्पित. देवाचरणी हेच मागणं महामंडळातील भ्रष्टाचार कमी होऊन एसटी अधिक समृद्ध व्हावी.

                     लालपरी.
कुणासाठी लालडबा कुणासाठी लालपरी
खासगीपेक्षा गड्या आपली एसटी च बरी,
कुणी म्हणत ओल्ड फॅशन तर कुणी जुनाट,
खेडोपाडी एसटीचा वेगळाच असतो थाट.

सणावार उत्सवात एसटीची साथ, 
अपघात झाल्यास एसटी देते मदतीचा हात, 
वादळवारा,ऊन-पाऊस कोणताही असो ऋतू,
प्रवाश्यांची सेवा हाच एसटीचा मुख्य हेतू.

ग्रामीण भागासाठी एसटी जीवनवाहिनी
मानवी जीवनास जसे रक्त आणी पाणी,
जेथे रस्ता तेथे एसटी जोडते नवी नाती,
एसटी संगे प्रवासात वाटत नाही भीती.

एसटीसंगे पर्यटन देवदर्शन करूया 
प्रसंगिक करारातुन अनुभवलेले
शाळेतील सहलीचे क्षण आठवूया
आनंदाचे आठवणींचे क्षण सुखाचे जगूया.

महिला सन्मान,अमृत ज्येष्ठ नागरिक 
एसटीच्या सवलती आहेत खास,
विद्यार्थी, कामगारांसाठी 
एसटीचा आहे मासिक पास.

उत्पन्न जास्त तरी एसटी नेहमी तोट्यात राही 
भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटता येत नाही,
असतात काही तांदळातील खडे
जगात कुणीच परिपूर्ण नाही.

वाढता भ्रष्टाचार लावतोय एसटीला फास 
कर्मचाऱ्यांना मात्र वेळेवर पगाराची आस,
सर्वच कर्मचारी काही वाईट नसतात पण काही कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणामुळे लोक 
 पूर्ण एसटीला कोसतात.

भ्रष्ट सरकार एसटीचा घेऊ पाहतंय जीव 
जीर्ण गाड्यांकडे पाहून त्यांना
प्रवाश्यांची येत नाही कीव,
म्हणून म्हणतो गड्याहो
एसटी जगली पाहिजे,
महाराष्ट्राची जीवनवाहिनी 
नेहमी धावत राहिली पाहिजे.

किती झाला त्रास तरी
एसटीसाठी लढत राहीन,
किती झाला त्रास तरी
एसटीसाठी लढत राहीन,
वाट पाहीन पण एसटीनेच जाईन!.
- हितेश.

१५-९-२०२५©copyrighted content 
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी