माझ्या संग्रहातील नाणी भाग 1


नमस्कार माझं नाव हितेश चव्हाण आज मी तुम्हाला माझ्या छोटाश्या संग्रहातील नाण्यांची माहिती देणार आहे त्याची सुरवात आपण काही ब्रिटिश काल खंडातील नाण्यांपासून करू 
1.ब्रिटिश भारतीय कालखंडातील नाणी 
अ)एक पैसा (जॉर्ज सहावा १९४३-१९४७)
सर्वप्रथम आपण ह्या नाण्यांबद्दल प्राथमिक माहिती घेऊया 
जारी करणारा इंडिया - ब्रिटिश (ब्रिटिश इंडिया ) 
किंग जॉर्ज VI (1936-1952)
प्रकार-सामान्य चलनातील कॉइन 
वर्ष 1943-1947
किंमत 1 पैसा (1⁄64)
करन्सी रुपया (1770-1947)
धातू  ब्रॉन्झ(तांबे)
वजन 2 ग्राम 
व्यास 21.32 mm
जाडी 1.0 mm
आकार राऊंड विथ अ राऊंड होल(गोलाकार आत मध्ये पोकळ छिद्र)
दर्शनी बाजू - या नाण्यांच्या दर्शनी भागावर राजेशाही मुकुट, हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषात नाण्याची किंमत तसेच इंग्रजी भाषेत INDIA हे नाव, नाणं ज्या वर्षी पाडलं ते वर्ष व ज्या टांकसाळीने पाडलं त्यांचं चिन्ह(mint mark of mint) हे कोरलेलं आहे 
मागील बाजू -या नाण्यांच्या मागील बाजूस वर्तुळकार द्राक्षाच्या वेली कोरलेल्या आहेत 
Issuer mint(ही नाणी पाडणाऱ्या टांकसाळी)-मुंबई, कोलकाता,लाहोर प्रिटोरिया दक्षिण आफ्रिका 
Issuer India - British (British India) 
King George VI (1936-1952)
Type Standard circulation coin
Years 1943-1947
Value 1 Paisa (1⁄64)
Currency Rupee (1770-1947)
Composition Bronze
Weight 2 g
Diameter 21.32 mm
Thickness 1.0 mm
Shape Round with a round hole
Obversed side- royal crown,denodenomination of coin in english, urdu, hindi language legend india in english year of issue, mint mark 
Reversed side:- grape wines covering all centre part 
 तर आता आपण ही नाणी पाडण्याची गरज का भासली ते पाहूया 
द्वितीय महायुद्धात भारत हा ब्रिटन च्या बाजूने लढत होता त्यातच ब्रिटिश सरकारला सैन्याला रसद पुरवणे व दारुगोळा पुरवणे हे प्राध्यान्य/प्रमुख उद्दिष्टय बनले धातूच्या कमतरतेमुळे वरील प्रकारची वेगळी नाणी पाडली गेली ह्यातील छिद्रपासून मिळालेल्या धातूचा उपयोग ब्रिटिशांनी बंदूकांची काडतूस बनवण्यासाठी केला 

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी