पत्रास कारण कि
प्रति,
महाराष्ट्रातील तमाम नागरिक
दिनांक- २९/९/२०२५
विषय- शेतकरी राजा कि रंक!
महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना माझा नमस्कार.
मी कोण?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; मी या राज्यातील एक सामान्य शेतकरी.पत्रास कारण कि, बळीराजा म्हणून माझी ओळख सर्वसाधारणपणे आहे.पण मी राजा आहे कि रंक? असा प्रश्न मला पडलाय. त्याचीच चर्चा आज मला तुमच्यासोबत करायचीय. कारण बरेच जण मी आत्महत्या केली कि त्यामागील कारण समजून न घेता विविध प्रकारे व्यक्त होतात. काही जणांना वाटत मी कर्ज काढून मज्जा करतो मग परतफेड करायची वेळ आली कि नुकसान झाल्याचे कारण सांगून आत्महत्या करतो पण खरं कारण मलाच माहिती आहे.
कालपासून तुम्ही बातम्यात एक बातमी वाचली असेल कि मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलीय कारण तिथे सतत मुसळधार पाऊस पडतोय. विलास बडे यांच्या सारखे सच्चे पत्रकार आणी काही स्थानिक प्रतिनिधी प्रत्यक्ष पुरात जाऊन पत्रकारिता आणी जनसेवा करतायत. या पुरात आमच्या मका टोमॅटो इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालंय.
आमच्यासाठी पीक म्हणजे आमची लेकरच आहेत आम्ही धरणीला आमची आई मानतो. पाच वर्ष मेहनत करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके जेव्हा एका क्षणात आडवी होतात तेव्हा आमच्या मनाची अवस्था वयाच्या पंचवीसव्या वर्षी देशासाठी कारगिल युद्धात शाहिद विराच्या मातेलाचं समजू शकते.दरवर्षी मी पिकासाठी जीवतोड मेहनत करतो पण कधी नैसर्गिक आपत्ती किंव्हा इतर कारणांमुळे नुकसान होऊन जात मग माझ्यापुढे चहुंबाजूंनी संकट आवासून उभी राहतात. मी माझी शेती माझ्या डोळ्यांदेखत अनेकदा गमावलीय.ते पाहून मला अनेकदा अतीव दुःख वेदना झाल्यात पण प्रत्येक वेळेस मी परिस्थिती पुढे हतबल झालोय पदरी उरली ती फक्त निराशा.
भारत सरकार कृषी क्षेत्रात अनेक योजना आणत. पण त्याचा लाभ नियमित फार कमी लोकांना मिळतो पीएम किसान योजनेचे हप्ते वेळेवर येत नाही.आले तरी त्यात भागात नाही. गैरव्यवहार बराच आहे अर्थात याठिकाणी सरकार आमच्या तोंडाला पानेच पुसत असत. कृषी विमा कम्पन्या नुकसान झाल्यास विमा भरपाई देण्यास अनेकदा टाळाटाळ करतात सरकारी कागदपत्र विलंबाने मिळतात त्यातही भ्रष्टाचार आडवा येतो. अनेकदा या योजनांचा प्रचार जास्त केला जात नाही. त्यात मुद्दाम काही जणांची नावे खोटी कारणे देऊन वगळली जातात. त्यामुळे या योजना असून नसल्यासारख्याच.त्यात अतिवृष्टी झाल्यास अनेकदा पूर्वसूचना न देता धरणातील पाणी सोडणे भाग असते त्यामुळे नदीकाठच्या शेतीच नुकसान होत. काही वेळेस सरकार पूर्वसूचना देत पण सर्वच शेतकरी बांधवांपर्यंत त्या रेंज अभावी पोहोचत नाहीत.पण देशभरातील वृत्तवाहिन्यांना त्याच काय पडलेले नसते कारण त्यांना राजकारणात जास्त रस असतो सकाळ ते संध्याकाळ कोणतेही वृत्तवाहिनी चालू केली कि नुसतं राजकारण चालू असो
सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत नेहमी दुटप्पीपणा करते. त्याने कष्टाने पिकवलेला माल घाऊक दरात कमी किमतीत विकत घेत. पण तोच माल त्याला किरकोळ किमतीत चार पट दराने विकत घ्यावा लागतो.उदा. टोमटो एक किलोमागे 10₹ अश्या दराने एक क्विंटल सरकार कृषी उत्पन्न बाजार समितीत विकत घेत. क्विंटलचा दर १०, ००० ₹ भेटतो तोच टोमॅटो किरकोळ दरात ८०₹किलो ने किराणा दुकानात त्याला विकत घ्यावा लागतो. म्हणजे तेव्हा क्विंटल चा दर थेट ८०, ००० ₹ म्हणजे शेतकऱ्याचा ७००००₹ नफा थेट सरकार,व्यापारी दलाल,अडते यांच्या घशात जातो त्याच्या हाती सर्व त्याच्या लागवडीचा,वाहतूक इ. खर्च वजा करून चार ते पाच हजार च उरतो.मलाही घरदार आहे लेकरं आहेत त्यांची शिक्षण आहे सांगा तुम्ही मला यात माझं कस भागेल. त्यातही अनेकदा कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजीने महागाई करून ज्यादा नफा व्यापारी कमवतात.
बर यातून वाचण्यासाठी मी थेट शेतकरी ते ग्राहक या तत्वाने मी तुमच्या दारात आठवडी बाजारात येतो पण तिथेही चाळीस रुपये किलो असताना ही तुम्ही घासघिस करता व दर कमी करता तुम्हीच सांगा कस चालेल हे दुकानात तुम्ही घेता ना ऐंशी रुपयाने मग!
आता तुम्ही म्हणाल सरकार देत कि मोफत बियाणं पण त्यातही मेख आहे. जरी मोफत बियाणं दिल तरी सध्या सर्व अंतरजालावर अवलंबून असल्याने रेंज चा प्रॉब्लेम कागदपत्र मोकळी नसने ती आद्ययवत नसणे यामुळे त्याचा लाभ अनेकांना भेटत नाही. त्यातही बियाणांच्या दर्जाचा प्रश्न येतोच. त्यात तणनाशक,कीटकनाशक,खते यांच्या किमती वाढीव आहेत. काहीवेळा गवे रेडे, डुक्करे, टोळधाड यामुळे नुकसान होऊन पंचनामा ते नुकसानभरपाई मिळेपर्यंत शेतकरी कर्जबाजारी होतो.
याबाबतीत कोकणच्या शेतकरी बांधवाला मानलं पाहिजे तो कितीही कठीण प्रसंग आला तर प्रसंगी चटणी भाकर खाऊन जगेल पण हार मानणार नाही. पण आता तोही शेती सोडून दुसऱ्या मार्गाला लागतोय जमिनी विकतोय त्याला मी एव्हढच सांगेन जमीन ही आई आहे ती विकू नका वेळ आज ना उद्या बदलेल
त्यात अनेक विकासकामात उदा. औद्योगिक वसाहती रस्ता रुंदीकरणात नवीन रस्ते निर्मिती यात शेतजमिनी अधिग्रहण केल्या जातात पूर्वापार जपलेल्या जमिनी सरकार अधिग्रहित करते त्याचा मोबदला देते पण तो काय जीवनभर पुरतं नाही अर्थात विकासकामांना विरोध नाही परंतु बळीराजाचा बळी जाऊ नये एव्हडीच माझी अपेक्षा आहे. शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वणवे, रानटी जनावरांमुळे होणारे नुकसान विकासकामात अधिग्रहित होणाऱ्या जमिनी, सरकारचे सोईस्कररित्या होणारे दुर्लक्ष यामुळे मी कर्जबाजारी होतो व आत्महत्येस प्रवृत्त होतो पण मला माहिती आहे हे चुकीचं आहे. मी सर्वांना आवाहन करतो कि कुणीही आत्महत्या करू नका शेवटी इतकंच म्हणेन
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
तुमचा कृपाभिलाषी
सर्वसामान्य शेतकरी
लेखक- हितेश चव्हाण.
सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा.
संपर्क- chavanhitesh63@gmail.com
२९-९-२०२५©copyrighted content
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM
Comments
Post a Comment