Posts

गणपतीचा गाऱ्हाणा

“बा देवा गणपती गजानना शिव गौरीच्या तनया रिद्धी सिद्धीच्या दाता! " व्हय महाराजा! सालाबाद प्रमाणे यंदाही आम्हा सर्वांनी तुजी स्थापना केलेली असा ती मान्य करून घे महाराजा!  व्हय महाराजा! त्यात काय कमी रव्हली असात तर ती पोटात घे आणी सर्वांका शेतीत आणी कामाधंद्यात यश दे रे महाराजा! व्हय महाराजा! हे अकरा दिवस तुज्या दर्शनाक जे जे भक्तजन येतलंत त्यांका सुख समृद्धी समाधान मिळानदे चाकरमान्यांका नोकरीं व्यवसायात यश दि पोराटोरांका शिक्षणात सुयश दे रे महाराजा!  व्हय महाराजा! हय ता आमच्या साखरप्या चो रसतो कित्येक वर्षा झाली खड्डेमय असा  त्याचा बरोबर मुंबई गोवा हायवे पण काही ठिकाणी भंगलो असत सरकारका तो दुरुस्ती करण्याची सद्बुद्धी दे रस्तो ठीक नाय केल्यानी तर या सरकारवर पटकी येवंदे दे रे महाराजा! व्हय महाराजा! दरवर्षी कोकण रेल्वेने चाकरमानी आरक्षण करान तुज्या सनासाठी येत असतात पण त्यांका तिकिट गावात नाय  ह्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार व्हता त्या काळोबाजार करणार्यांवर पटकी येवंन्दे रे महाराजा! व्हय महाराजा!  आजकाल मराठी माणसाने मराठी बोलना कमी केलेला आसात यामुळे परप्रांरतीय मह...

आजी

नमस्कार माझं नाव हितेश आज मी तुमच्या समोर मी लिहिलेली आजी ही कविता सादर करतोय.                          आजी. आजी म्हणजे आजी म्हणजे आजी असते, तिच्यासारखी प्रेमळ व्यक्ती जगात दुसरी नसते||धृ|| मुलांपेक्षा जीव तिचा नातवंडांवर असतो, त्यांच्यासाठी जीव तिचा तीळ तीळ तूटतो||१ || नातवंडांच्या आजारपणात चिंताग्रस्त असते ती, बालपणीच्या लीला आठवून मंद गोड हसते ती, आजी म्हणजे अनुभवाचा फार मोठा बटवा असतो  किती केला रिता तरी तो संपता संपत नसतो||२|| लांब असतील नातवंड तर आठवणीने व्याकुळ होते, जवळ येताच त्यांच्यावर मायेचा वर्षाव करते, स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करते ती, सर्वांशी मिळून मिसळून हसत खेळत राहते ती||३|| एक वेळ नकळत अचानक अशी येते, लाडकी आजी आपल्याला सोडून दूर निघून  जाते, मागे राहते आठवणींचे न संपणारे पोते||४|| म्हणून म्हणतो आजी-आजोबांना फक्त प्रेम हवं असत, ते गेले देवाघरी तर आपल्या हाती फक्त; रडत बसणं असत,फक्त रडत बसणं असत ||५|| - हितेश. २७-८-२०२५©copyrighted content  लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय  सदर प...

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी

Image
पहिला भाग   ☝️पहिल्या भागाची लिंक नमस्कार माझं नाव हितेश मागील भागात आपण रायगडची प्रभावळ व नैसर्गिक संरचना समजून घेतली.आता रायरी ज्या जवळीच्या खोऱ्यात होता त्या जावळीवर राज्य करणाऱ्या चंद्रराव मोरेंचा इतिहास,छत्रपती शिवराय व जावळी,जावळीच्या मोऱ्यांचे प्रभावळीतील इतर सरदारांशी असलेले सहसंबंध,व रायरीचा दुर्गराज रायगड होण्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. चंद्रराव मोरेंचा इतिहास  :- चंद्रगुप्त मौर्य याच्या काळात मौर्य सम्राज्याचा विस्तार दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणात त्याच्या मृत्युंनंतर बिंबीसार हा राजगादी वर आला मात्र बिंबीसाराच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये गादीसाठी एकच नरसंहार झाला त्याच्या मुलांपैकी एक चंद्रराव मौर्य हा जावळीच्या खोऱ्यात सम्राट अशोकापासून वाचण्याकरिता लपून बसला. त्याकाळात जावळीचे खोरे हे कृष्णा व वारणा नद्या‌ंंकाठी पन्हाळा,विशाळगड ते रायरी महाबळेश्वर असे विस्तीर्ण व घनदाट होते या चंद्ररावाने येथे चंद्रराव मोर्य म्हणून आपले स्वातंत्र्य राज्य साथपन केले चंद्रराव मोर्य हा मोरेंचा घराण्याचा संस्थापक होय.‘ मौर्य’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन मोरे हे आडनाव रूढ ...

रोजच्या व्यवहारातील इंग्रजी शब्दांचे काही मराठी पर्यायावाचक शब्द

Image
माझ्या मराठीचीये काय बोलू कवतुके|परी अमृतातेही पैजासी जिंके||  संत ज्ञानेश्वरांच्या वरील ओळी मराठी भाषेचा यथार्थ गौरव करतात. याच मराठी भाषेत आपण इंग्रजी भाषेतील अनेक शब्द लादून ते मराठी शब्द असल्यासारखेच वापरतो. इंग्रजीभाषेतून मराठी भाषेत आलेल्या व प्रचलित झालेल्या शब्दांचे मराठी शब्द पुढील प्रमाणे. १)पेन - लेखणी. २)रिफील- दौत . (भारतात संगणक येण्यापूर्वी अनेक वर्षांपासून बोरुची लेखणी व शाईचा दौत  लिहिण्यासाठी वापरण्याचा रिवाज होता इंग्रजी राजवटीत शाईच्या पेनाच्या शोधामुळे क्रांती घडली परंतु दौत कायम राहिला. दौतीतील शाई संपली कि पुन्हा भरावी लागे. लिहिताना कपडे हात इत्यादी खराब होऊ नये म्हणून दौत, लेखणी यांच्या जोडीला टिपकागद असे. आधुनिक युगात पेनाचे स्वरूप बदलले व वापरा आणी फेकून द्या या तत्वावर दौतीचे स्वरूप बदलून तिची रिफील झाली परंतु दोघांचा उद्देश सारखा असल्याने रिफीलीस दौत म्हणता येईल असे मला वाटते ) ३)बँक -  अधिकोष. ४)इंटरनेट - आंतरजाल. ५) कीबोर्ड - कळफलक. ६) व्हिडीओ - चलचित्र . ७)कॅमेरा- छायाचित्रक . ८)फोटो - प्रकाशचित्र, छायाचित्र. (पूर्वीच्या काळी छा...

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

Image
नमस्कार माझं नाव हितेश माझं वय २१ वर्षे आहे.मला इतिहास ह्या विषयाची विशेष आवड आहे.मी मुंबई विद्यापीठातून कला शाखेतून बॅचलर ऑफ आर्ट्स पदवीधर आहे.                  आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या किल्ल्यांं‍पैकी एक अश्या किल्ले रायगड बद्दल थोड्या वेगळ्या पद्धतीने माहिती जाणून घेणार आहोत. या लेखासाठी मला युट्युब या माध्यमावरील ‘roadwheel rane' या चॅनेल ची मदत झाली आहे.तसेच मी रायगड प्रत्यक्ष पहिला असल्याने त्याचे अनुभव ही या लेखात आपण पाहणार आहोत.                  दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड          रायगड समजून घेण्यापूर्वी आपणास रायगडाचे भौगोलिक स्थान,त्याचे महत्व, रायगडावरून दिसणारे त्याचे संरक्षक दुर्ग, गडासंबंधित चौकी,पाहारे,घेरा,मेट/माची,खळगा, खिंड इ. संज्ञा अभ्यासणे व रायगडाचा शिवपूर्वकालीन,शिवकालीन,उत्तरकालीन इतिहास अभ्यासणे क्रमप्राप्त ठरते.   रायगडाचा इतिहास अभ्यासण्यापूर्वी रायगडाची भौगोलिक संरचना अभ्यासणे महत्वाचे ठरते.  दु...

शोध समाधीचा; रायगडावरील पुतळाबाईंच्या समाधीची कुत्र्याच्या समाधीद्वारे होणारी विटंबना!

Image
छत्रपती शिवाजी महाराज व वाघ्या/ कोणत्याही प्रकारचा कुत्रा ह्यांचा कोणताही संबंध नव्हता. हे तत्कालीन प्रथम किंव्हा दुय्यम दर्जाच्या उपलब्ध साहित्य वाङमयातून दिसून येते या साहित्य वाङमयात सभासद बखर, शिवभारत, ९१ कलमी बखर, जेधे शकावली या ग्रंथाचा समावेश होतो.  मात्र यातील सभासद बखर हि कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या समकालीन सल्लागाराने राजाराम राजांच्या आज्ञेने लिहिलेली व अष्टप्रधान मंडळातील वाकनीस या पदावरील दत्ताजी त्रिमल वाकनिसांच्या ९१ कलमी बखरी या समकालीन असल्याने प्रमाण मानल्या जातात यात हि कुत्र्याच्या उल्लेख नाही.परंतु राजकारण्यांच्या व ब्रिगेडी पिलावळीच्या नादाला लागून  त्या पवित्र जागी कुत्र्याची समाधी बसवण कितपत योग्य आहे? आज आपण पुतळाबाईंच्या समाधीच हि त्या वाघ्या कुत्र्याची समाधी असल्याचे ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेऊन सिद्ध करणार आहोत   सर्वप्रथम काही ऐतिहासिक कागदपत्रातील शिवरायांच्या निधनाविषयीचे उल्लेख आपण पाहूया  १. सभासद बखर:-        शिवरायांच्या काळात सल्लागार पदावर(सभासद) कार्यरत असणाऱ्या कृष्णाजी अनंत सभासद ह्यांना छत्रप...

किल्ले जंजिरे मेहरुब आणी शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज

Image
रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील मुरुड नजीकच्या  दंडाराजपुरी गावातील एका बेटावर असलेला अजिंक्य असा जंजिरा किल्ला इसवी सन १६१७ मध्ये   पेरिमखान नावाच्या  हबशी सरदराने राम पाटील या स्थानिक कोळी बांधवाच्या कडून दग्याने जिंकून निजामकडून परवानगी घेऊन बांधला. त्यापूर्वी तिथे मेढेकोट होता.मेढेकोट म्हणजे लाकडी दमदमे(बुरुज )व तटबंदी त्यावर कोळी लोकांचे राज्य होते.त्यातील कोल्यांच्या शेवटचा प्रमुख राम पाटलास  तेलाच्या व्यापाराच्या निमित्ताने किल्ल्यात आसरा घेऊन तेलाच्या पिंपात  सैन्य लपवून कैद केले व त्याचा नंतर शिरच्छेद केला पेरिमखान हेच सिद्धीचे मूळ पुरुष. हे सिद्धी मूळचे आबेसेनिया प्रांतातील अबेसेनिया चा अपभ्रउंश हबशी   पुढे जाऊन भारतीय परकीय राज्यकर्ते मुघल, निजामशाहा, आदिलशहा कुतूबशहा इ. पातशह्यांचे समुद्रावर फारसा वचक  नसल्याने हा सिद्दी सार्वभौम बनला परंतु शिवाजी महाराजांनी आरामारी व जलदूर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे सिद्धिवर वाचक बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या मोहिमेचा आपण आज विस्ताराने आढावा घेणार आहोत. तसेच संभाजी राजांनी बांधलेला पूल, कोंडाजी फर...