ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.
नमस्कार आज आपण अंतरराष्ट्रीय स्तरावर जे ग्रेगोरियन कालगणना(कॅलेंडर) वापरतो मात्र त्याचा इतिहास आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती नसतो तर आज आपण त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. ज्यूलीएट्स सीझर. ज्यूलीयन कालगणना हि ज्यूलीएट्स सीझर याने पंधराव्या शतकात सुरु केली हि सौर कालगणना होती.अर्थात पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्यास लागणारा काळ हा एक वर्ष धरून त्याचे विभाजन बारा महिन्यात केले गेले. ३६५दिवस६तास म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष हे ज्यूलीयन कालगणनेने मान्य केले. मग हि सहा तासांची पोकळी भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी लीप वर्ष मानून एक दिवस म्हणजे २३फेब्रुवारी दोनदा धरला जात होता.परंतु काही कालावधीनंतर लोकांच्या कालगणनेत गडबड असल्याचे लक्षात आले कारण इस्टर हा ज्यूलीयन कालगणनेनुसार २१ मार्चला यायचा पण तो कालगणनेतील एका नजरचुकीमुळे शतकानुशतक मागे जायला लागला.मग सीझर च्या असं लक्षात आल कि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास ३६५दिवस ६तास इतका वेळ नाही लागत.तर तो वेळ हा ३६५ दिवस ५तास ४८ मिनिट इतका आहे. ह्या बारा मिनिटांच्या पोकळीमुळे दर हजार ...