Posts

पत्रास कारण कि

प्रति, महाराष्ट्रातील तमाम नागरिक  दिनांक- २९/९/२०२५ विषय- शेतकरी राजा कि रंक!  महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना माझा नमस्कार. मी कोण?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; मी या राज्यातील एक सामान्य शेतकरी.पत्रास कारण कि, बळीराजा म्हणून माझी ओळख सर्वसाधारणपणे आहे.पण मी राजा आहे कि रंक? असा प्रश्न मला पडलाय. त्याचीच चर्चा आज मला तुमच्यासोबत करायचीय. कारण बरेच जण मी आत्महत्या केली कि त्यामागील कारण समजून न घेता विविध प्रकारे व्यक्त होतात. काही जणांना वाटत मी कर्ज काढून मज्जा करतो मग परतफेड करायची वेळ आली कि नुकसान झाल्याचे कारण सांगून आत्महत्या करतो पण खरं कारण मलाच माहिती आहे.  कालपासून तुम्ही बातम्यात एक बातमी वाचली असेल कि मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलीय कारण तिथे सतत मुसळधार पाऊस पडतोय.  विलास बडे यांच्या सारखे सच्चे पत्रकार आणी काही स्थानिक प्रतिनिधी  प्रत्यक्ष पुरात जाऊन पत्रकारिता आणी जनसेवा करतायत. या पुरात आमच्या मका टोमॅटो इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालंय. आमच्यासाठी पीक म्हणजे आमची लेकरच आहेत आम्ही धरणीला आमची आई मानतो. पाच वर्ष मेहनत करून तळहात...

महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील ठिकाणांच्या नावामागील व्युत्पत्ती भाग१.

नमस्कार आज मी तुम्हाला मुंबईतील २१ प्रसिद्ध ठिकाणांंच्या नावामागील इतिहास जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण मुंबईचा इतिहास जाणून घेऊया,मुंबई हि इंग्रजांना सोळाव्या शतकात पोर्तुगीजाकडून आंदण म्हणून मिळाली त्यानंतर त्यांनी वर्षाला दहा पाउंड इतक्या भाड्यावर ती इस्ट इंडिया कंपनीला दिली तेव्हा तिचे स्वरूप आजच्या मुंबई सारखे नव्हते तेव्हा ती सात बेट होती ती पुढीलप्रमाणे मुंबई,माहीम,वरळी,परळ, कुलाबा,छोटा कुलाबा,माझगाव.  तसेच आजूबाजूला छोटी बेट सुद्धा होती पुढे ‘ हॉर्नी बेलार्ड ’ या प्रकलपांतर्गत भराव टाकून आजच्या मुंबईचे स्वरूप तिला प्राप्त झाले. चला तर मग लेखाला सुरुवात करूया. १.मुंबई- मुंबईला मुंबई हे नाव मुंबा देवी वरून पडले मुंबा+आई =मुंबई.पुढे इंग्रजांना भारतीय भाषांचे वावडे असल्याने त्यांनी त्याचे नामकरण बॉम्बे केले. २. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -  ह्या भागाचे पूर्वीचे नाव बोरिबंदर होते येथे जवळ एक बंदर होते जेथे सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट चा परिसर आहे.तसेच बोरीची मोठ्या प्रमाणात झाडें होती ह्यामुळे ह्याला बोरिबंदर नाव पडले पुढे भारतातील पहिली रेल्वे ठाणे ते बोरिबंदर अशी धावल्य...

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

Image
नमस्कार आज आपण अंतरराष्ट्रीय स्तरावर जे ग्रेगोरियन कालगणना(कॅलेंडर) वापरतो मात्र त्याचा इतिहास आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती नसतो तर आज आपण त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत.           ज्यूलीएट्स सीझर. ज्यूलीयन कालगणना हि ज्यूलीएट्स सीझर याने पंधराव्या शतकात सुरु केली हि सौर कालगणना होती.अर्थात पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्यास लागणारा काळ हा एक वर्ष धरून त्याचे विभाजन बारा महिन्यात केले गेले. ३६५दिवस६तास म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष हे ज्यूलीयन कालगणनेने मान्य केले.   मग हि सहा तासांची पोकळी भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी लीप वर्ष मानून एक दिवस म्हणजे २३फेब्रुवारी दोनदा धरला जात होता.परंतु काही कालावधीनंतर लोकांच्या कालगणनेत गडबड असल्याचे लक्षात आले कारण इस्टर हा ज्यूलीयन कालगणनेनुसार २१ मार्चला यायचा पण तो कालगणनेतील एका नजरचुकीमुळे शतकानुशतक मागे जायला लागला.मग सीझर च्या असं लक्षात आल कि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास ३६५दिवस ६तास इतका वेळ नाही लागत.तर तो वेळ हा  ३६५ दिवस ५तास ४८ मिनिट    इतका आहे. ह्या बारा मिनिटांच्या पोकळीमुळे दर हजार ...

महाराष्ट्र पोलीस दलातील श्रेणी नुसार पदे

Image
नमस्कार आज मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलातील पद श्रेणी नुसार सांगणार आहे हा क्रम उतरता असणार आहे. १. Director General of Police- पोलीस महासंचालक.(महाराष्ट्र पोलीस प्रमुख ) २.Additional Director Genral of Police- अतिरिक्त पोलीस महासंचालक. ३. Inspector General of Police- पोलीस महानिरीक्षक. ४. Deputy  Inspector General of Police- पोलीस उपमहानिरीक्षक. ५.. Superintendent of Police/Deputy Commissioner of Police.- पोलीस अधिक्षक. ६.Additional Superintendent of Police.- अतिरिक्त पोलीस अधिक्षक. ७. Asistant Commissioner of Police/Deputy Superintendent of Police.- पोलीस उपाधिक्षक. ८. Senior Police Inspector - वरिष्ठ पोलीस निरीक्षक. ९. Police Inspector.- पोलीस निरीक्षक. १०. Asistant Police Inspector.-सहाय्यक पोलीस निरीक्षक. ११. Police Sub  Inspector.- पोलीस उपनिरीक्षक. १२. Asistant Police Sub Inspector.-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. १३. Head Constable.- हवालदार. १४. Police Naik.- पोलीस नाईक. १५. Police Constable.- पोलीस शिपाई. माहिती संकलक- हित...

लालपरी

Image
नमस्कार आजची हि कविता महाराष्ट्राच्या लाडक्या जीवनवाहिनी अर्थात एसटी ला समर्पित. देवाचरणी हेच मागणं महामंडळातील भ्रष्टाचार कमी होऊन एसटी अधिक समृद्ध व्हावी.                       लालपरी. कुणासाठी लालडबा कुणासाठी लालपरी खासगीपेक्षा गड्या आपली एसटी च बरी, कुणी म्हणत ओल्ड फॅशन तर कुणी जुनाट, खेडोपाडी एसटीचा वेगळाच असतो थाट. सणावार उत्सवात एसटीची साथ,  अपघात झाल्यास एसटी देते मदतीचा हात,  वादळवारा,ऊन-पाऊस कोणताही असो ऋतू, प्रवाश्यांची सेवा हाच एसटीचा मुख्य हेतू. ग्रामीण भागासाठी एसटी जीवनवाहिनी मानवी जीवनास जसे रक्त आणी पाणी, जेथे रस्ता तेथे एसटी जोडते नवी नाती, एसटी संगे प्रवासात वाटत नाही भीती. एसटीसंगे पर्यटन देवदर्शन करूया  प्रसंगिक करारातुन अनुभवलेले शाळेतील  सहलीचे क्षण आठवूया आनंदाचे आठवणींचे क्षण सुखाचे जगूया. महिला सन्मान,अमृत ज्येष्ठ नागरिक  एसटीच्या सवलती आहेत खास, विद्यार्थी, कामगारांसाठी  एसटीचा आहे मासिक पास. उत्पन्न जास्त तरी एसटी नेहमी तोट्यात राही  भ्रष्टाचाराच्या विळख्यातू...

गणपतीचा गाऱ्हाणा

“बा देवा गणपती गजानना शिव गौरीच्या तनया रिद्धी सिद्धीच्या दाता! " व्हय महाराजा! सालाबाद प्रमाणे यंदाही आम्हा सर्वांनी तुजी स्थापना केलेली असा ती मान्य करून घे महाराजा!  व्हय महाराजा! त्यात काय कमी रव्हली असात तर ती पोटात घे आणी सर्वांका शेतीत आणी कामाधंद्यात यश दे रे महाराजा! व्हय महाराजा! हे अकरा दिवस तुज्या दर्शनाक जे जे भक्तजन येतलंत त्यांका सुख समृद्धी समाधान मिळानदे चाकरमान्यांका नोकरीं व्यवसायात यश दि पोराटोरांका शिक्षणात सुयश दे रे महाराजा!  व्हय महाराजा! हय ता आमच्या साखरप्या चो रसतो कित्येक वर्षा झाली खड्डेमय असा  त्याचा बरोबर मुंबई गोवा हायवे पण काही ठिकाणी भंगलो असत सरकारका तो दुरुस्ती करण्याची सद्बुद्धी दे रस्तो ठीक नाय केल्यानी तर या सरकारवर पटकी येवंदे दे रे महाराजा! व्हय महाराजा! दरवर्षी कोकण रेल्वेने चाकरमानी आरक्षण करान तुज्या सनासाठी येत असतात पण त्यांका तिकिट गावात नाय  ह्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार व्हता त्या काळोबाजार करणार्यांवर पटकी येवंन्दे रे महाराजा! व्हय महाराजा!  आजकाल मराठी माणसाने मराठी बोलना कमी केलेला आसात यामुळे परप्रांरतीय मह...

आजी

नमस्कार माझं नाव हितेश आज मी तुमच्या समोर मी लिहिलेली आजी ही कविता सादर करतोय.                          आजी. आजी म्हणजे आजी म्हणजे आजी असते, तिच्यासारखी प्रेमळ व्यक्ती जगात दुसरी नसते||धृ|| मुलांपेक्षा जीव तिचा नातवंडांवर असतो, त्यांच्यासाठी जीव तिचा तीळ तीळ तूटतो||१ || नातवंडांच्या आजारपणात चिंताग्रस्त असते ती, बालपणीच्या लीला आठवून मंद गोड हसते ती, आजी म्हणजे अनुभवाचा फार मोठा बटवा असतो  किती केला रिता तरी तो संपता संपत नसतो||२|| लांब असतील नातवंड तर आठवणीने व्याकुळ होते, जवळ येताच त्यांच्यावर मायेचा वर्षाव करते, स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करते ती, सर्वांशी मिळून मिसळून हसत खेळत राहते ती||३|| एक वेळ नकळत अचानक अशी येते, लाडकी आजी आपल्याला सोडून दूर निघून  जाते, मागे राहते आठवणींचे न संपणारे पोते||४|| म्हणून म्हणतो आजी-आजोबांना फक्त प्रेम हवं असत, ते गेले देवाघरी तर आपल्या हाती फक्त; रडत बसणं असत,फक्त रडत बसणं असत ||५|| - हितेश. २७-८-२०२५©copyrighted content  लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय  सदर प...