आधुनिक युगातील 'तुकाराम'
माझ्या आदर्श व्यक्तिमत्वांच्या यादीतील एक असलेले २००५ च्या महाराष्ट्र केडर चे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत(UPSC) देशातून विसावी श्रेणी धारण केलेले व सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम हरिभाऊ मुंढे यांचं आत्मचरित्र दिनांक १७ जुलै २०२५ ला पुण्यात प्रकाशित झालं. पण त्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती मला त्याबद्दल चार दिवसांनी समजलं.आणी लगेच मी ते पुस्तक मागवलं.हे पुस्तक वाचून खरंतर मी निशब्द झालो परंतु या पुस्तकाबाबत लिहिण्याची सुप्त इच्छा मला गप्प बसू देत नव्हती;कारण पुस्तक इतक प्रभावी आणी दर्जेदार आहे की मी स्वतःला लिहिण्यापासून थांबवू शकलो नाही. लेखक शफी पठाण यांनी लिहिलेल्या ‘तुकाराम' या मुंढे साहेबांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन दिनांक १७ जुलै २०२६ रोजी झाले असून त्याची प्रथमावृत्ती १७ जुलै २०२६ रोजी तर सव्वीसावी आवृत्ती १८ जुलै २०२६ रोजी प्रकाशित झाली. जी माझ्याकडे आहे. पुस्तकाला प्रस्तावना तुकाराम मुंढे यांचे ज्येष्ठ बंधू माजी अप्पर जिल्हाधिकारी श्री. अशोक मुंढे यांची आहे.पुस्तकाच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठाचे रेखांकन...